Breaking

Dr. Pankaj Bhoyar : अनाथ, दिव्यांगांसोबत पालकमंत्र्यांचा एक दिवस!

A day of guardian minister with orphans, disabled : शेगावांत घेतले श्री संत गजानन महाराजांचे दर्शन

Wardha विदर्भाची पंढरी म्हणून ख्यातिप्राप्त श्रीसंत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्याची इच्छा भाविक नेहमीच बाळगून असतात. परंतु, धकाधकीच्या आयुष्यामुळे अनेकदा शेगावला दर्शनाला जाण्याचा योग जुळून येत नाही. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वर्ध्यातील अनाथ व दिव्यांगांना ‘श्रीं’च्या दर्शनासह सहलीचा योग जुळवून आणला.

त्यांनी सपत्निक १२५ बालगोपालांसोबतच शेगाववारी केली. शहरातील शिवाजी चौधरी यांच्या आसमंत स्नेहालयातील अनाथ, निराधार मुले-मुली व दिव्यांगांना या वारीवर नेण्यात आले आहे. मंगळवारी, सकाळी ७ : ३० वाजता पालकमंत्री डॉ. पंकज भोयर हे त्यांच्या सुविद्य पत्नी शितल यांच्यासह स्थानिक इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज परिसरातून तीन खाजगी बसनी रवाना झाले. या तिर्थस्थळ प्रवासात आसंमत स्नेहालय येथील ७० बालक व ४७ दिव्यांग सहभागी झाले आहेत.

Nagpur Improvement Trust : उपराजधानीत वारकरी भवनाच्या कामाला गती

त्यांच्यासोबत आसंमत स्नेहालयचे संचालक शिवाजी चौधरी, भाजप दिव्यांग आघाडीचे संजय जाधव, संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य शितल डोंगरे, सौरभ देशमुख, आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हा संयोजक सतीश वैद्य, भाजयुमोचे महासचिव चेतन गुजर, वर्धा विधानसभा महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा ठाकूर, आदी सहभागी झाले आहेत.

Pyare Khan : उर्दू शाळांमधील गैरकारभाराला बसणार चाप

ज्या मुलांच्या भाळी निसर्गाने सर्वसामान्य जीवन दिलेले नाही. त्या मुलांना समाज म्हणून आपण सामान्य जीवन जगण्याचा अधिकार मिळवून देण्याकरिता आपला वाटा उचलावा, हा या प्रवासामागील उद्देश आहे. बालपण कुणाचेही असो, ते हसण्या-खेळण्याचे आणि स्वच्छंदपणे बागडण्याचे असते.

हा अधिकार आपण अनाथ आणि दिव्यांग मुलांना दिला पाहिजे, ते आपले कर्तव्य आहे, ही माझी भावना आहे. या मुलांकरिता आपल्या आयुष्याचा होम करून झटणाऱ्या व्यक्तींच्या पाठिशी उभे राहण्याचाही हा एक प्रयत्न आहे, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले