Breaking

Dr. Pankaj Bhoyar : आशा सेविकांनाही मिळणार टॅब, Technosavy करणार

Asha workers will also get tabs : पालकमंत्री डॉ. भोयर यांनी दिला शब्द; स्वयंसेविका गौरव पुरस्कार

Wardha कोविड काळात आशा सेविकांनी अतिशय उत्कृष्ट आरोग्यसेवा दिली. आशा सेविका या आरोग्य विभागाचा कणा आहेत. येणाऱ्या काळात प्रत्येक आशा सेविकेस तंत्रस्नेही करण्यासाठी टॅब वितरण करण्यात येईल. तसेच गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांचे मानधनवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.

सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद वर्धा यांच्या वतीने आयोजित सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका गौरव पुरस्कार तथा जिल्ह्यातील ५४ गटप्रवर्तकांना टॅबचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार राजेश बकाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांची उपस्थिती होती.

Vidarbha Farmers : वन अधिकाऱ्यांची शेतकऱ्याला बेदम मारहाण!

गुणवत्तावाढीसाठी टॅब महत्त्वपूर्ण आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बालमृत्यू शून्यावर आणण्यासाठी गटप्रवर्तक व आशा सेविकांनी प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले. पुढील वर्षीही टॅबसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. आशा सेविका ही एक चळवळ असून त्यांना बळकट करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल, असे जितीन रहमान म्हणाले.

कोरोना काळात आशा सेविकांनी केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही. आशांना टॅबचे प्रशिक्षण देऊन अधिक सक्षम करावे, असे आमदार राजेश बकाने म्हणाले. काम पूर्ण करण्याची हमी म्हणजेच आशा होय, असंही ते म्हणाले. गटप्रवर्तक यांना टॅब वितरणाचा हा कार्यक्रम राज्यात पहिलाच आहे. यासाठी त्यांनी पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाने कौतुक केले.

Zilla Parishad Akola : विरोधक नरमले, याचिका मागे घेतली!

यावेळी सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविकांना पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव पुरस्कार वितरित करण्यात आला. जिल्हास्तरीय आशा प्रथम पुरस्कार भारती, द्वितीय सारिका गुल्हाने व तृतीय पुरस्कार व मनोरमा चव्हाण, तालुकास्तरीय प्रथम संगीता ईखार, द्वितीय सुनीता पडघन व तृतीय पुरस्कार भावना कुरसंगे तर आशा गटप्रवर्तक प्रथम पुरस्कार मीनाक्षी गायकवाड, द्वितीय कविता भोगे व तृतीय पुरस्कार जोत्स्ना कळसकर यांना देण्यात आला.