Dr. Pankaj Bhoyar: लोकसंख्या वाढतेय, पाणी पुरवठ्याचे नियोजन करा

Audit water supply by surveying according to growing population : राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या प्रशासनाला स्पष्ट निर्देश

Wardha शहरालगतच्या ग्रामपंचायती लोकसंख्येने मोठ्या आहेत. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्याबाबतचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. गरजेनुसार नव्याने नियोजन करुन प्राधान्याने नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने समन्वय साधून पाणी पुरवठ्याचे ऑडिट करून पाणीपुरवठा नियमित करण्याचे निर्देश राज्याचे गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार, गृहनिर्माण, खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

पंचायत समिती, वर्धा येथे आयोजित संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे, तहसीलदार संदीप पुंडेकर, गटविकास अधिकारी प्रफुल लोखंडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

CM Devendra Fadnavis : मेयो-मेडिकलमधील कामांच्या देखरेखीसाठी वॉर रूम !

नागरिकांना पिण्याचे पाणी प्राधान्याने उपलब्ध व्हावे. यासाठी मागील काळात सतत पाठपुरावा करून नवीन पाण्याच्या टाक्या सुरू केल्या आहेत. असे सांगून राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर पुढे म्हणाले, बऱ्याच ठिकाणी पाईपलाईनमध्ये किरकोळ दुरुस्त्या असतील तर तात्काळ दुरुस्त करुन घ्याव्यात. मागणीनुसार हँडपंप, विहीर, नवीन पाईपलाईन आदींचे प्रस्ताव सादर करावे.

जुन्या विहिरीतील गाळ काढणे, पाईपलाईनचे जॉइंट, अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या लिकेज, पाईपलाईन टाकताना होणारे खड्डे आदी दुरुस्त्या कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांनी गावनिहाय आढावा घेतला. तेथील पाणी पुरवठ्याविषयीच्या तक्रारी जाणून घेतल्या व तक्रारींचे निवारण तात्काळ करण्याच्या सूचना जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिल्या.

Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, ‘पोस्टर लावून मतं मिळत नाहीत’

प्रत्येक ग्रामपंचायतीला नळ पाईपलाईनचे नकाशे उपलब्ध करुन द्यावे. त्यामुळे खोदकाम करताना पाईप लिकेज होणार नाही. प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होईल, पिण्याच्या व वापराच्या पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशाही सूचना दिल्या.