‘Eco Park’ will be a boon for employment : निर्मितीसाठी २ कोटी ६४ लाख रुपये खर्च करणार
Wardha सेलू मतदारसंघातील दत्तक ग्राम सालोड (हिरापूर) येथे आगामी काळात एक नवीन इको पार्क तयार होणार आहे, जे न केवळ पर्यटकांसाठी एक आकर्षक स्थळ बनेल, तर स्थानिक लोकांसाठी रोजगाराची मोठी संधीदेखील निर्माण करेल. राज्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी या प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभात ही माहिती दिली.
डॉ. भोयर म्हणाले, ‘जनतेच्या आशीर्वादामुळे आमच्या कार्यक्षेत्राचा विस्तार झाला आहे व आमची जबाबदारीही वाढली आहे. सालोडमध्ये प्रत्येक योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे.’ इको पार्कच्या निर्मितीसाठी २ कोटी ६४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय, क वर्ग पर्यटनअंतर्गत विद्युतीकरण व सौंदर्यीकरणासाठी २ कोटी रुपये खर्च होतील. आयुर्वेदिक कॉलेज ते सावंगी-पालोती रस्त्याकडे जाणारा रस्ता ५ कोटी १६ लाख रुपयांत होईल.
Illegal sand mining and transportation : लोकांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनीच टाकली धाड
ग्रामसचिवालय ग्रामपंचायत सालोड ६४ लाख, सालोड-नागठाणा रस्ता मजबुतीकरण ३० लाख, आई मंदिर ते राष्ट्रीय महामार्ग जाणारा रस्ता २० लाख व इंदिरानगर सालोडकडे जाणारा रस्ता सिमेंटीकरण ३० लाख अशी विविध विकासकामे हाती घेण्यात येत आहेत.
‘आमच्या जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची ही कर्मभूमी आहे. सेवाग्राम विकास आराखडा, बोर अभयारण्य अशा जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी आणण्यात आम्ही पुढाकार घेतला आहे,’ असं डॉ. भोयर म्हणाले. सालोडवासीयांतर्फे व विविध संघटनांतर्फे राज्यमंत्री डॉ. भोयर यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
या समारंभात माजी खासदार रामदास तडस, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, उपवनसंरक्षक हरवीर सिंग, दत्ता मेघे हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्च सेंटरचे डॉ. राजू बोरले, कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, सरपंच अमोल कन्नाके, वास्तुविशारद किशोर चिद्दरवार, उपसरपंच आशिष कुचेवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती.