Eight schools in the district will become ‘modern’ : पालकमंत्र्यांचा जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत संवाद
Wardha जिल्हा परिषद शाळांना चांगल्या सुविधा देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये चांगल्या व गुणवत्तापूर्ण सुविधा मिळाव्या. तसेच या शाळांसर्वांसाठी आदर्श ठराव्या यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील एक शाळा आदर्श मॉडेल स्कूल बनविण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण, गृह ग्रामीण व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा ज्ञानाजर्नाचे कार्य करतात. परंतु या शाळांमधील दर्जाबाबत नेहमीच ओरड असते. मात्र आता शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी या शाळांना खासगी शाळांप्रमाणे सोयीसुविधा देण्याचा चंग बांधला आहे. ग्रामीण भागातील शाळांना अत्याधुनिक सुविधा व दर्जान्नोती करण्यासाठी त्यांनी पावले उचलली आहे.
Pankaj Bhoyar : गुणवत्ता वाढीसाठी डिजिटल लर्निंग प्रकल्प उपयुक्त
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जि.प. शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., जिप चे मुख कार्यकारी अधिकारी जितीन रहमान उपस्थित होते. पालकमंत्री भोयर यांनी शाळांमधील उपलब्ध सुविधा व अडचणींबाबत माहिती जाणून घेतली. शाळांना आवश्यक असलेल्या साधनसामग्री व भौतिक सुविधांची माहिती त्यांनी घेतली. मॉडेल स्कूलसंदर्भातील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याशी संवाद साधून त्यांच्या संकल्पना जाणल्या.
शालेय शिक्षण राज्यमंत्री भोयर यांनी शुक्रवारी आंजी मोठी येथील जिप केंद्रिय प्राथमिक शाळेला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. यावेळी माजी सरपंच जगदिश संचारिया, शिक्षका जाधव व काळसर्पे उपस्थित होत्या. शिक्षणमंत्र्यांनी शाळेच्या दर्जान्नोतीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी दिले.
Dr. Pankaj Bhoyar : विज्ञान स्पर्धेच्या बक्षिसात होणार वाढ; प्रथम पुरस्कार ५१ हजाराचा!
या शाळांचा समावेश
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेनुसार जिल्हयात आठ शाळा आदर्श मॉडेल स्कूल बनविण्यात येणार आहे. या शाळांमध्ये वर्धा तालुक्यातील आंजी मोठी येथील जिप प्राथमिक शाळा, सेलू तालुक्यातील चानकी कोपरा जिप प्राथमिक शाळा, देवळी तालुक्यातील अडेगाव येथील जि. प. प्राथमिक शाळा, हिंगणघाट तालुक्यातील नांदगाव जि.प. प्राथमिक शाळा, आर्वी तालुक्यातील रसुलाबाद जि.प. प्राथमिक शाळा, आष्टी तालुक्यातील थार येथील जि.प. प्राथमिक शाळा,कारंजा घा. तालुक्यातील सावळी खुर्द येथील जि.प. प्राथमिक शाळा व समुद्रपूर तालुक्यातील मंगरूळ येथील जि.प. प्राथमिक शाळेचा समावेश आहे.