Guardian Minister listened to citizens’ problems in Janata Darbar : जनता दरबारात ऐकून घेतले नागरिकांचे म्हणणे
Wardha आमदारर-खासदार-मंत्र्यांकडे नागरिकांची रोजच गर्दी असते. कुणी नोकरी मागण्यासाठी येतो तर कुणी आर्थिक मदत. पण सर्वाधिक गर्दी असते ती समस्या सांगणाऱ्यांची. रोज समस्या ऐकून घेतल्यानंतरही जनता दरबारात पुन्हा मोठी गर्दी होतच असते. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना असाच अनुभव आला. रोज लोकांच्या समस्या ऐकून घेतल्यावरही जनता दरबाराला झालेली गर्दी बघून त्यांनाही आश्चर्य वाटले.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी रविवारी १६ रोजी येथील विकास भवनाच्या सभागृहात ‘जनता दरबार’ घेतला. समस्यांशी निगडित प्रश्न त्यांच्यापुढे आले. त्यांनी जागेवरच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले. तसेच नागरिकांच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
Amravati Belora Airport : बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव?
डॉ. पंकज भोयर यांनी सुरू केलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली होती. हा सेवा पंधरवडा संपूर्ण राज्यात राबविण्यात आला होता. आता जनता दरबाराच्या माध्यमातून ते लोकांच्या समस्यांचे निरसन तर करत आहेत. मात्र, लोकांच्या समस्यांचा रिघ काही कमी होण्याचे नावच घेत नाही.
Vanchit Bahujan Aghadi : पाणीपट्टीच्या प्रश्नांसाठी अकोलेकर पोहोचले मुंबईत!
विकास भवनात आयोजित जनता दरबाराला जिल्ह्यातील गावखेड्यांमधील शेतकरी, कष्टकरी, विविध पक्षीय कार्यकर्ते तसेच शहरांतील विविध क्षेत्रातील नागरिक, व्यावसायिक, शासकीय अधिकारी-कर्मचारी, शासनाच्या विविध उपक्रमांतील अस्थायी कर्मचारी, सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक आपले विविध प्रश्न, समस्या घेऊन आले होते. डॉ. भोयर यांनी प्रत्येकाशी संवाद साधला. प्रश्न समजून घेतले. आणि अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.