Improve quality to survive the competition from private schools : पालकमंत्र्यांचा शिक्षकांना सल्ला;
Wardha देशाची भावी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षणासोबतच नैतिक मूल्यांची सांगड घालणे काळाची गरज आहे. खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हे एकच परिमाण आहे. गुणवत्तापूर्ण, तंत्रस्नेही व मूल्याधिष्ठित शिक्षण हाच परिवर्तनाचा मूलमंत्र आहे, असा सल्ला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शिक्षकांना दिला.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने विविध उपक्रम व स्पर्धांच्या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी., माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीषा भंडग, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नीतू गावंडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे आदींची उपस्थिती होती.
MP Amar Kale : खेड्यांतील घरांनाही द्या अडिच लाखांचे अनुदान!
युवा पिढी देशाचे भविष्य आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम करावे. शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान वापराचे कौशल्य आत्मसात करून विद्यार्थ्यांमध्ये ते रुजविण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी. म्हणाल्या.
Special Public Safety Mission : असे कसे सरकारविरुद्ध बोलता येणार नाही?
यावेळी २०२३-२४ मध्ये दर्जेदार शिक्षणासाठी घेण्यात आलेल्या व्हिडिओ स्पर्धेत ७५० शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता. या सहभाग नोंदविलेल्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पुरस्काराचे वितरण, नवोपक्रम स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरण, जिल्ह्यातील १७ पीएमसी शाळेतील शिक्षकांना शिक्षण शैक्षणिक साहित्याचे वितरण व मिशन समृद्धी अंतर्गत विज्ञान संचाचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.