Responsibility of the administration to deliver the scheme to the people : शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी घेतला आढावा
Gondia शासन राबवित असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे. लोकाभिमुख कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे. ही जबाबदारी प्रशासनाची आणि संबंधित विभागांची आहे. त्यामुळे शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म विभागाने कुशल कामे करावीत, असे स्पष्ट निर्देश गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म विभागांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, जिल्हा परिषद सभापती लक्ष्मण भगत, जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करुन यशस्वीपणे राबवा. ‘पीएम श्री शाळा’ योजनेत गोंदिया जिल्ह्यात 20 शाळा असून यावर Human Resource Development यावर खर्च झालेला आहे. यामुळे शाळांची पटसंख्या वाढलेली आहे. या 20 शाळांचे विकासात्मक Audit करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी शिक्षण विभागाला दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार ‘पीएम श्री शाळा’ उपक्रमाच्या धर्तीवर ‘सीएम श्री शाळा’ उपक्रम सुरु करण्यात याव्या असे त्यांनी सांगितले. राज्यात 478 शाळेत ‘आदर्श शाळा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात एकूण 1642 शाळा असून ‘आदर्श शाळा’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात 9 छोट्या व 9 मोठ्या शाळांचे बांधकाम करण्यात आलेले आहे. या शाळांचे सुध्दा विकासात्मक audit करण्यात यावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
Sahasram Korote : काँग्रेसने मला अंधारात ठेवले, विश्वासघात केला !
गोंदिया जिल्ह्यात 290 विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत. 39 आदिवासी सहकारी संस्था आहेत. जिल्ह्यात अशा एकूण 329 सहकारी संस्था आहेत. त्यापैकी 121 सहकारी संस्थांचे संगणकीकरण झाले आहे. हे आंतरराष्ट्रीय सहकारीता वर्ष आहे. याअंतर्गत 12 कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या सर्व उपक्रमांची माहिती लोकप्रतिनिधींना देण्यात यावी असे त्यांनी सांगितले.