Breaking

Dr. Pankaj Bhoyar : राज्यमंत्र्यांनी घेतला बचत गटांच्या भोजनाचा आस्वाद

The Minister of State relished the food of Bachat Gat : जिल्हास्तरीय मिनीसरसचा समारोप; सपत्नीक दिली भेट

Wardha शहरातील सर्कस मैदानात १३ ते १७ या कालावधीत पाच दिवसीय ‘जिल्हास्तरीय मिनीसरस’चे आयोजन करण्यात आले होते. वर्धिनी महोत्सवात राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पत्नी ॲड. शीतल भोयर यांच्यासह भेट देत बचत गटाकडून उत्पादित भोजनांचा त्यांनी आस्वाद घेतला.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांतील महिलांची उपजीविका वाढविण्यासाठी त्यांनी बनविलेल्या उत्कृष्ट उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळावी, यासाठी पाच दिवसीय आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, माजी नगराध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, वंदना भुते आदी उपस्थित होते.

Prataprao Jadhav : बुलढाण्यात शिवसागर उसळला !

महिला बचत गटामार्फत खाद्यपदार्थांसोबतच विविध वस्तू तयार करण्यात येत असून, या वस्तू दर्जेदार स्वरूपाच्या करण्यासाठी बचत गटांना यंत्र सामग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वर्धिनी महाेत्सवात पाहणी करताना महिला बचत गटातील महिलांना दिले.

Forest Department : वाघ, बिबट्याच्या २२ मिश्या, खवले मांजराचे दात जप्त !

जिल्ह्यात १४ हजार बचत गट..
जिल्ह्यात एकूण १४ हजार महिला बचत गट कार्यरत असून, जवळपास १३ हजार बचत सक्रिय आहेत. या बचत गटांमार्फत उत्कृष्ट अशा वस्तू तयार करण्यात येत आहेत. या वस्तूंना बाजारपेठ मिळविण्यासाठी वस्तूची चांगली पॅकेजिंग होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाच्यावतीने यंत्र सामग्री उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ना. पंकज भोयर यांनी सांगितले.