Women power made history in India : पंचायत समितीच्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन
Wardha आदर्श व सुसंस्कृत समाज घडविण्यात महिलांचा मोठा वाटा आहे. समाजात संस्काराची पेरणी करण्याचे कार्य ती करीत असते. याच संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे जागतिक कीर्तीचे राजे होऊन गेले. स्त्री शक्तीनेच भारतात इतिहास घडवला आहे. महिलाशक्तीचा समाजाने सन्मान करणे आज गरजेचे आहे, असे प्रतिपादन गृहराज्य मंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समितीच्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महिला व बालकल्याण अधिकारी मनीषा कुरसंगे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल लोखंडे, बालविकास प्रकल्प अधिकारी कल्पना माळोदे, पोलिस विभाग सायबर सेलच्या स्मिता महाजन, जिल्हा उद्योग केंद्राचे रोशन तायवाडे आदी उपस्थित होते.
Women unsafe in Nagpur, Nagpur Police : महिला वकिलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार !
राज्यमंत्री म्हणाले की, ‘आदिकाळापासून स्त्री संघर्षमयी जीवन जगत आली आहे. तरीही तिने संघर्षातून आपलं महत्त्व सिद्ध केलं आहे. राजमाता माँसाहेब जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महान कार्य केले आहे. सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले. तर राजमाता जिजाऊ यांनी जगाला आदर्श असे राजे दिले आहे.’
समाजात चांगले संस्कार रुजविण्याचे कार्य महिलांच्या हातून घडते. पुरुषप्रधान संस्कृतीतून समाजाला पूर्णपणे बाहेर पडण्याची आज गरज असल्याचेही ते म्हणाले. बालविकास प्रकल्प अधिकारी कल्पना माळोदे यांनी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून महिला मेळावा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.
Vijay Wadettivar : वडेट्टीवारांचा मविआ नेत्यांना घरचा अहेर !
मेळाव्यात स्वच्छता, आरोग्य, कुटुंब, कायदेविषयक, सायबर सुरक्षा व अन्य महत्त्वपूर्ण बाबींवर माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. संचालन पल्लवी पुरोहित यांनी केले. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जाधव, सहायक गटविकास अधिकारी संदीप पानतावणे, डॉ. तेजश्री तेलखेडे, विशाखा काळबांडे व महिलांची उपस्थिती होती. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्ञानदा मयूर लांबट, शिवण्या प्रवीण वांदिले यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.