Breaking

Dr. Pankaj Bhoyar : शाश्वत शेतीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

 

A collective effort is needed for sustainable agriculture : राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची कृषी विद्यापीठाला भेट

Akola बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये वैदर्भीय शेती अधिक शाश्वत होण्याची गरज आहे. तसेच शेतकरी संपन्न होऊन फायद्याची शेती कृतीत येणेही आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभागासह इतर सर्व संलग्नित शासकीय, निमशासकीय, सहकारी विभागांनी एकत्र यावे. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांतूनच हे शक्य आहे, असे राज्याचे गृह, गृहनिर्माण,शालेय शिक्षण, सहकार व खणीकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.

आधुनिक शेती तंत्रज्ञान, मूल्यवर्धन तथा विपणनासह व्यावसायिक शेती तंत्रज्ञान प्रचार-प्रसार आणि अवलंब वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्नांची मोट बांधावी, असे आवाहनही त्यांनी केले. विदर्भातील शेती क्षेत्र सुजलाम सुफलाम होण्यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठे द्वारा विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांची माहिती घेण्यासाठी डॉ. पंकज भोयर यांनी कृषी विद्यापीठाला भेट दिली. यावेळी कुलगुरु कार्यालयाच्या सभागृहात कृषी संशोधक, अधिकारी वर्गाशी चर्चा करताना ते बोलत होते.

Ladki Bahin Yojna : अकोल्यात ५० महिलांनी सोडला लाभ!

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे अध्यक्षतेत कुलगुरू कार्यालयाच्या समिती सभागृहात संपन्न झालेल्या या अतिशय महत्त्वाकांक्षी चर्चेदरम्यान विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. शामसुंदर माने, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी अनुक्रमे कृषि शिक्षण, संशोधन तथा विस्तार क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपलब्धी संबंधी सभागृहाला अवगत केले. तर कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी शाश्वत विदर्भ विकासासाठी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

Kirit Somaiya : अकोल्यात मोठा घोटाळा; बांग्लादेशी-रोहिंग्यांना असे दिले नागरिकत्व !

आदर्श गाव संकल्पनेला तथा विद्यापीठाच्या शिक्षण संशोधन आणि विस्तार विषयक कार्याला अधिक व्यापक करण्यासाठी राज्य तथा केंद्र शासनाचे भरीव सहयोगाची अपेक्षा व्यक्त केली. या चर्चासत्र प्रसंगी विद्यापीठाचे संचालक अधिष्ठाता सहयोगी अधिष्ठाता विभागप्रमुख शास्त्रज्ञ अधिकारी कर्मचारी वर्गासह कृषी विभागाचे सुद्धा अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मंत्री महोदयांचा विद्यापीठाची कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे शुभ हस्ते कृषि संवादिनी देऊन सत्कार सन्मान करण्यात आला.