Dr. Pankaj Bhoyar : सरकार पाठीशी, पण उत्तम दर्जाची उत्पादनं तयार करा!

 

Fund of Rs 10.16 crores for self-help groups in Wardha district : पालकमंत्र्यांचे आवाहन; बचतगटांना १०.१६ कोटींचा निधी

Wardha केंद्र व राज्य शासनाच्या वतीने महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील बचत गटांच्या सक्षमीकरणाकरिता ३९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. यामध्ये आणखी विशेष वर्धा जिल्ह्यासाठी १० कोटी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर करून बचत गटांना वितरण करण्यात आला आहे.

सरकार महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पण या निधीतून बचत गटांनी उत्तम दर्जाची उत्पादनं तयार करावी, असे आवाहन गृहनिर्माण, गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रण व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने सर्कस मैदान येथे २२ ते २५ मार्च या कालावधीत जिल्हास्तरीय प्रदर्शनी व विक्री वर्धिनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे आज उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

Dr. Pankaj Bhoyar : अरे बाप रे! एवढ्या समस्या? पालकमंत्रीही दमले!

बाजारपेठेत स्पर्धेचे युग आहे. कोणत्याही वस्तूला उत्तम दर्जाची पॅकेजिंग असल्यास उत्पादनाला चांगला भाव मिळू शकतो. यासाठी ४५ लाख रुपयांच्या निधीतून बचत गटांना पॅकेजिंग मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या मशिनचा चांगला उपयोग करून वस्तूचे उत्तम दजाचे पॅकेजिंग केल्यास वस्तूला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळून बचत गट सक्षम करण्यास मदत होईल, असे पालकमंत्री म्हणाले.

Dr. Pankaj Bhoyar : जिल्ह्यातील आठ शाळा होतील ‘मॉडर्न’!

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते महिला बचत गटांना १० कोटी १६ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे महिला बचत गट प्रभाग संघांना वितरण, तसेच विविध कार्यक्रमासाठी भेट वस्तू म्हणून देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सौंदर्य वर्धिनी बास्केट, आस्था वर्धिनी बॉस्केट, आरोग्य वर्धिनी बॉस्केट, स्नेहा वर्धिनी बॉस्केट, आयुर्वेद उत्पादने बास्केटचे अनावरण व आवाहन पत्राचे विमोचन करण्यात आले.