Breaking

Dr. Pankaj Bhoyar : पाण्याच्या कारणाने होणारे स्थलांतर थांबवा!

Stop water-induced migration : १५ गावांसाठी आराखडा तयार करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Wardha सध्या संपूर्ण विदर्भात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे. यामध्ये शहरातील टंचाईवर टँकरचा उपाय करण्यात येतो. पण ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गावंच्या गावं स्थलांतरीत होतात. यंदा वर्धा जिल्ह्यातील १५ गावांच्या संदर्भात विशेष आराखडा तयार करून स्थलांतर थांबविण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले आहेत.

आर्वी आणि कारंजा तालुक्यांतील १५ गावांमधील दुग्धव्यवसाय करणारी गवळी समाजातील काही कुटुंबे उन्हाळ्यात जनावरांना चारा आणि पाणी उपलब्ध होत नसल्याने स्थलांतरित होतात. पाणी नसल्याने स्थलांतरण करावे लागावे, ही अतिशय वाईट बाब आहे. या गावांमध्ये कायमस्वरूपी पाणी व चारा पुरवठ्याच्या उपाययोजना करण्यासाठी येत्या आठवड्यात आराखडा सादर करा आणि मे महिन्यात जास्तीत जास्त कामे करा, अशा सूचना भोयर यांनी दिल्या.

Akash Fundkar : म्हणून शेवटच्या बिंदूपर्यंत पाणी पोहोचत नाही!

आर्वी, कारंजा तालुक्यांतील १५ गावांमधील स्थलांतरण थांबविण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार सुमित वानखेडे, आमदार दादाराव केचे, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, उपवनसंरक्षक हरविंदर सिंग, उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाट आदी उपस्थित होते.

आर्वी तालुक्यातील बेढोणा, बोथली पा., बोथली हेटी, चांदणी, गुमगाव, सालदरा, तळेगाव र, किन्हाळा, पांजरा तर कारंजा तालुक्यातील पांजरा गोंडी, दानापूर, कन्नमवारग्राम, खैरवाडा, माळेगाव काळी, सेलगांव उमाटे, चोपण या गावांमध्ये गवळी समाजातील अनेक कुटुंबे जनावरांना चारा आणि पाणी उपलब्ध होत नसल्याने उन्हाळ्याच्या कालावधीत काही महिन्यांसाठी इतर ठिकाणी स्थलांतरित होतात.

Vidarbha Farmers : २५५ कोटींचे कर्जवाटप, तरी शेतकरी सावकाराच्या दारी!

याठिकाणी पाणी व चारा उपलब्ध करून स्थलांतर थांबविण्यासाठी विविध विभागांच्यावतीने कोणती कामे तेथे घेतली जाऊ शकतात, याचा आराखडा येत्या आठवड्यात तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. आमदार सुमित वानखेडे, आमदार दादाराव केचे यांनी या गावांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. तलाव, नाले, धरणांमधील गाळ काढणे, रोपवन तयार करणे, वन भागात बंधारे, वृक्ष लागवड, पाणी अडवणे व जिरवणे यांसारख्या उपाययोजना घेण्याच्या सूचना केल्या.