CM Fadnavis will take opinion while deciding the Guardian Minister : मुख्यमंत्री फडणवीसांकडून घेतले जाऊ शकते मत
भंडारा- मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर लवकरच पाकलमंत्रीपदाची जबाबदारी निश्चित होणार आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी जिल्ह्यांना पालकमंत्री मिळतील असं सांगण्यात येत आहे. पाकलमंत्रीपद मिळण्यासाठी महायुतीमधील अनेक मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. एखादा जिल्हा आपल्याला मिळावा यासाठी अनेक मंत्री लॉबिंग करीत आहेत. Bhandara भंडाऱ्याचा पालकमंत्री ठरविण्यात मात्र आमदार परिणय फुके यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
विदर्भातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक असलेल्या भंडाऱ्याचा पालकमंत्री कोण होणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये भाजपचे माजी मंत्री तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार डॉ. परिणय फुके यांचं प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरच पालकमंत्री ठरणार आहे, असे बोलले जात आहे.
Local Body Elections : 22 जानेवारीच्या निकालाकडे इच्छुकांचे लक्ष !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नीकटवर्तीयांमध्ये डॉ. फुके यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळं भंडाऱ्याचा पालकमंत्री निश्चित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डॉ. फुके यांचं मत विचारात घेतले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आजपर्यंत डॉ. परिणय फुके यांनी एखादा शब्द फडणवीस यांच्याकडे टाकला आणि तो पूर्ण झाला नाही, असं झालेलं नाही. त्यामुळे ते कुणाचं नाव सूचवतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
गेल्या महायुती सरकारच्या काळात ओबीसी समाजाने नागपुरात आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी डॉ. परिणय फुके यांनी या आंदोलनात यशस्वी मध्यस्थी केली होती. मंत्री अतुल सावे यांच्यासोबत त्यांनी ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठक घडवून आणली होती. त्यानंतर ओबीसी समाजाचा राग शांत झाला. ओबीसींचे अनेक प्रश्न मार्गी लागले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात महायुतीमध्ये समन्वय ठेवण्याचं कसब डॉ. फुके यांनी दाखवलं. त्यामुळे महायुतीला यश मिळालं आणि डॉ. फुके यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं.
Praful Patel : दोन राष्ट्रवादी एकत्र येणे हा कौटुंबिक विषय !
भंडारा जिल्ह्यात भाजपची पाळमुळं घट्ट करण्यात आमदार डॉ. परिणय फुके यांनी परिश्रम घेतले आहेत. ते यापूर्वी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. त्यामुळे भाजपला या जिल्ह्यात आपलं वर्चस्व कायम ठेवावं लागणार आहे. परिणामी भंडाऱ्याला पालकमंत्री नियुक्त करताना डॉ. फुके यांना मुख्यमंत्र्यांकडून विचारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.