Dr. Punjabrao Deshmukh Interest Subsidy Scheme : शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदरावर पीक कर्ज

 

Crop loan to farmers at zero percent interest rate : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना

Wardha शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी अल्पदराने कर्ज मिळावे व कर्जाची परतफेड मुदतीत व्हावी. यासाठी कर्जाच्या व्याजदरावर सवलत देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना सुरू करण्यात आली आहे.

तीन लाख रुपयांच्या कर्ज मर्यादेपर्यंत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत केल्यास केंद्र शासनातर्फे ३ टक्के व राज्य शासनातर्फे ३ टक्के असे एकूण ६ टक्के सरसकट व्याज सवलतीचा लाभ देण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे ३ लक्ष रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होते.

MSRTC : एका तिकीटाच्या खर्चात दोघांचा प्रवास

सध्या शेतकऱ्यांना ३ लक्ष पर्यंतच्या घेतलेल्या कर्जावर बँकातर्फे ६ टक्के व्याज आकारण्यात येते. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारमार्फत ३ लक्ष रुपये मर्यादेपर्यंतच्या अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत केल्यास सरसकट ३ टक्के व्याज दरात सवलत देण्यात येत होती.

राज्य शासनाने देखील अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होण्यासाठी तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ३ लाख अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत (३६५ दिवस किंवा ३० जूनचे आत) करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ टक्के व्याज सवलतीचा लाभ सन २०२१-२२ पासून देण्याची योजना जाहीर केली आहे.

Mahayuti Government : पिक स्पर्धेला वर्ध्यातील शेतकऱ्यांचा ‘खो’!

या योजनेचा लाभ देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व खासगी बँका यांनी लाभधारकांची यादी त्यांनी घेतलेले कर्ज, परतफेडीची रक्कम व दिनांक इत्यादी तपशिलासह थेट तालुक्याचे सहायक निबंधक यांच्याकडे मागणी प्रस्ताव दाखल करतील. त्यानुसार तालुका सहायक निबंधक यांनी तपासून शिफारस केलेले प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्यास्तरावर उपलब्ध निधीनुसार प्रस्ताव मंजूर केले जातात.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या योजनेत सहभाग वाढावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले आहे.