Breaking

Dr. Rajendra Shingne : जातीपातीचं राजकारण सोडा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या!

NCPappeals government to leave caste politics and focus on farmers’ issues : शरद पवार गटाचा सरकारवर हल्लाबोल; सिंदखेडराजात शेतकऱ्यांचा मोर्चा

Sindkhedraja : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. जिल्हापरिषद आणि नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांना शेतकऱ्यांचा पुळका आला आहे. यात शरद पवारांची राष्ट्रवादीदेखील मागे नाही. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वात सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादीने शेतकऱ्यांचा मोर्चा काढला. ‘जातीपातीचे राजकारण बाजुला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या’, असं आवाहन या मोर्चातून करण्यात आलं.

‘हा मोर्चा शेतकऱ्यांचा आहे, कोणीही जातीच्या राजकारणात न अडकता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावं’ – अशा शब्दांत माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी भाजप सरकारवर टीका केली. सिंदखेडराजा येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून डॉ. शिंगणे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जाब विचारला.

Harshwardhan Sapkal : मनसेनंतर काँग्रेसही पोहोचले मीरा भाईंदरमध्ये, चर्चासत्र घेणार!

फडणवीस सरकारने उद्योगपतींचं तब्बल १६ लाख कोटींचं कर्ज माफ केलं. मात्र निवडणूकपूर्व आश्वासन देऊनही शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवलं. या विरोधात शेतकरी, कष्टकरी, सर्व समाजघटकांनी एकत्र येत हा मोर्चा काढला, असं शिंगणे म्हणाले.

Harshvardhan Sapkal : काँग्रेस करणार जनसुरक्षा कायद्याची होळी!

जर या मतदारसंघात एखादा वाल्मिक कराड जन्माला आला, तर मग मराठ्यांचाही स्वतंत्र मोर्चा निघेल. पण हा आजचा मोर्चा फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचा आहे. कोणीही या विषयावर राजकारण करू नये. राज्याचा कारभार सध्या अनाजी पंतांच्या हातात आहे. कर्जमाफीच्या नावाखाली सरकार फक्त लबाडाच्या घरचं आवतन देत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.