Breaking

Dr. Rajendra Shingne : पराभवाने खचून जाऊ नका, नव्याने तयारीला लागा!

NCP’s Sharad Pawar faction starts preparations for elections : डॉ. शिंगणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन; स्थानिक निवडणुकांच्या तयारीला वेग

Buldhana “निवडणुकीत जय-पराजय चालत असतो. एका पराभवाने खचून न जाता कार्यकर्त्यांनी पुन्हा नव्याने जोमाने तयारीला लागावे,” असे स्पष्ट आणि राजकीयदृष्ट्या मर्मभेदी आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. देऊळगाव राजा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)कडून हालचालींना वेग आला असून, पक्ष संघटन मजबूत करत स्थानिक आघाड्यांच्या शक्यताही खुले ठेवल्या जात आहेत. २१ जून रोजी आर्या लॉन्स येथे झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत डॉ. शिंगणेंच्या प्रमुख उपस्थितीत राजकीय रणनिती आखण्यात आली.

MNS Sandip Deshpande : ‘त्या’ ३८०० लोकांचं काय घेऊन बसलात ?

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रभाग रचना प्रक्रिया सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने ताकदीनं उतरावं, यासाठी बैठकीत रणनीती ठरवण्यात आली. डॉ. शिंगणेंनी प्रशासनाकडून सुचवलेल्या प्रभाग रचनेवर नाराजी व्यक्त करत स्थानिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवावा, असेही स्पष्ट केले.

डॉ. शिंगणेंनी बैठकीत संकेत दिला की, भविष्यातील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक राजकीय समिकरणांचा विचार करीत आघाड्यांचे दरवाजे खुले ठेवेल. यामुळे आगामी निवडणुकांत काँग्रेस, भाजप व इतर पक्षांसमोर राष्ट्रवादीचा संयुक्त आघाडीचा पर्याय मोठे आव्हान ठरू शकतो.

Hindi Language Conflict : हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र!

या बैठकीत माजी नगराध्यक्ष शांतीलाल सिंगलकर, तुकाराम खांडेभराड, आलमखान कोटकर, गंगाधर जाधव, शहराध्यक्ष विजय खांडेभराड, महिला अध्यक्षा मंदा शिंगणे, तसेच कार्यकर्ते गणेश सवडे, कवीश जितूरकर, रंगनाथ कोल्हे, महेश देशमुख, अ‍ॅड. अनिल शेळके, अभिनव खांडेभराड आदींसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. बैठकीचे संचालन अर्जुन आंधळे यांनी केले.