Breaking

Dr. Rajendra Shingne : सत्ताधाऱ्यांच्या प्रलोभनांना जनता कंटाळली, शिंगणे यांचा दावा

People are tired of Government’s false promises : स्थानिक निवडणुकीत महाविकास आघाडी एकजुटीने काम करणार

Buldhana “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या केवळ पदांसाठी नव्हे, तर खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचे राजकारण ठरवणाऱ्या निवडणुका आहेत. महाविकास आघाडी या निवडणुकांमध्ये एकजुटीने आणि ताकदीने उतरेल,” असा ठाम विश्वास माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला.

२२ जून रोजी बुलडाणा शहरातील नर्मदा हॉलिडेज येथे महाविकास आघाडीच्या समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिंगणे होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सिद्धार्थ खरात, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, माजी आमदार राजेश एकडे, शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, राष्ट्रवादीचे नेते नरेश शेळके यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते.

Harshvardhan Sapkal : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ. आषाढी वारीच्या दिंडीत सहभागी होणार

डॉ. शिंगणे यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधत सांगितले की, “राज्यात सत्तेवर आलेले सरकार हे केवळ प्रलोभनांच्या राजकारणावर उभे आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंत अनेक आश्वासने अपूर्ण राहिली आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी संकटात असताना, महाविकास आघाडीच त्यांच्या आशेचा किरण आहे.”

Anand paranjpe : अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड; सरकारने कारवाई करावी: परांजपे

 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी आघाडीच्या सामूहिक लढ्याचा पुनरुच्चार करत सांगितले की, “कार्यकर्त्यांना बळ देणं आणि आघाडीची ताकद दाखवणं हीच खरी जबाबदारी आहे.” आमदार धीरज लिंगाडे, सिद्धार्थ खरात, माजी आमदार एकडे यांनीही सरकारविरोधातील जनतेच्या असंतोषाचे पडसाद ग्रामीण भागात जाणवत असल्याचे सांगत यशाचा विश्वास व्यक्त केला.

शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी सत्ताधाऱ्यांच्या फसव्या धोरणांविरोधात जनआंदोलन छेडण्याचे आवाहन केले. बैठकीत जालिंदर बुधवत यांनी प्रारंभिक भूमिका मांडली. अनेक आघाडीतील स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.