Dr. Dhumal first said, “I don’t know,” but then stopped talking : डॉ. धुमाळ आधी म्हणाले “मला माहिती नाही”, नंतर मात्र बोलती बंद
Paltan : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. भाऊबीजेच्या दिवशी एका नामांकित हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या या तरुणीच्या सुसाईड नोटमधील आरोपांमुळे पोलिस आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या नोटमध्ये तिने पीएसआय गोपाळ बदने, प्रशांत बनकर आणि एका खासदाराचे नाव नमूद करत शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. परंतु अद्याप मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने फरार असून सातारा पोलिसांना त्याचा मागोवा घेता आलेला नाही.
तरुण डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर लिहिलेल्या नोटमध्ये स्वतःवर होत असलेल्या छळाची माहिती रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. अंशुमन धुमाळ यांना दिल्याचा उल्लेख केला होता. मात्र ‘एबीपी माझा’शी बोलताना डॉ. धुमाळ यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. “डॉक्टर तरुणीने मला कुठेही लेखी तक्रार दिलेली नाही. त्यांनी केवळ जिल्हा शल्यचिकित्सकांच्या चौकशी समितीसमोर काही मुद्दे मांडले होते. त्यानुसार आम्ही सूचना दिल्या आणि प्रकरण तिथेच संपले,” असे डॉ. धुमाळ म्हणाले.
Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांची झोपडपट्टीतील चिमुकल्यांसोबत दिवाळी
पीएसआय गोपाळ बदने या नावावरून विचारले असता, डॉ. धुमाळ यांनी पूर्णपणे हात वर केले. “गोपाळ बदने हे नाव मी प्रथमच ऐकत आहे. आमच्या रुग्णालयातील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी किंवा नर्सनी असा प्रकार घडल्याचे सांगितलेले नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
BMC Election 2025: भाजपचा “150 पार” नारा, शिंदे दिल्लीला रवाना
दरम्यान, मृत डॉक्टर तरुणीने खासदारांचे दोन पीए रुग्णालयात आले आणि त्यांनी खासदारांचे बोलणे जोडले, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यावर भाष्य करण्यास डॉ. धुमाळ यांनी नकार दिला. “मला मृत डॉक्टर तरुणीने खासदारांविषयी काहीही सांगितले नाही, त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही,” असे ते म्हणाले.
Bangladeshi infiltrators : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार !
या घटनेनंतर साताऱ्यात तसेच राज्यभर संताप व्यक्त होत असून, मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदनेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास जलदगतीने होऊन संबंधितांना न्याय मिळावा, अशी मागणी डॉक्टर आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे.
_____








