Breaking

Drinking water scheme : सदोष पाइपलाइन फुटली, गावात कृत्रिम पाणीटंचाई

Water shortage in the village due to burst pipe line : ७४ लाखांच्या निधीतून पेयजल योजनेचे काम

Wardha आष्टी तालुक्यातील मोई गावात ७४ लाख रुपये खर्च करून तीन किलोमीटरची पाइपलाइन, पाणीपुरवठ्याची टाकी आणि फिल्टरचे काम करण्यात आले होते. मात्र, निकृष्ट दर्जाचे सदोष काम झाल्याने ही पाइपलाइन जागोजागी फुटत आहे. त्यातच गेल्या पाच दिवसांपूर्वी पाइपलाइन फुटल्याने गावात पाणीटंचाई उद्भवली आहे.

आष्टी शहीद तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या असलेल्या डोंगरमाथ्यावरील मोई गावामध्ये दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून काम करण्यात आले. मात्र, काम सदोष करण्यात आले. त्यामुळे ठिकठिकाणी जलवाहिनी फुटल्याने गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यातही काहींनी संधी शोधत २०० रुपये द्या अन् एक ड्रम पाणी विकत घ्या, असा व्यवसाय सुरू केल्याने गावकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

Senior citizens : ‘14567’ ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर तोडगा !

सुसुंद्रा तलावावरून मोई गावातील पाणीपुरवठ्याची पाइपलाइन टाकण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणी ही पाइपलाइन फुटल्याने १६ जानेवारीपासून पाणीपुरवठा ठप्प झाला. मोईच्या सरपंच चव्हाण यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पाइपलाइन दुरुस्त करून देण्याची मागणी केली; मात्र अद्यापही या विभागाचे कोणीही अधिकारी गावात पोहोचले नाहीत. साधी पाहणीसुद्धा केली नाही. त्यामुळे फुटलेली पाइपलाइन अद्यापही दुरुस्त करण्यात आली नाही.

ही पाइपलाइन जंगलामधून टाकण्यात आल्यामुळे दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत. दीड वर्षापूर्वीच या पाइपलाइनचे काम करण्यात आले होते. सकाळी उठल्यापासून कामधंद्यासाठीसुद्धा पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे गावातील काहींनी खासगी टँकर सुरू केले. कोसो दूरवरून टँकर भरून आणावे लागत असल्याने डिझेलचा खर्च आणि ट्रॅक्टरच्या भाड्याचा खर्च परवडणारा नाही. म्हणून २०० लिटरच्या एका ड्रमसाठी २०० रुपये मोजावे लागत आहेत.

दररोज पाण्यासाठी महागडी किंमत मोजणे ग्रामस्थांना शक्य नसल्यामुळे संपूर्ण गावात असंतोष पसरला आहे. प्रशासन मूग गिळून आहे. त्यामुळे मोई गावाला कोणी वाली नाही का? असा प्रश्न आता ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. दोन दिवसांत तत्काळ पाइपलाइन दुरुस्त करून गावाला पाणीपुरवठा सुरळीत करा. अन्यथा ग्रामीण पाणीपुरवठा विभागासमोर आंदोलन करण्याचा इशारा मोई येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

Crop Loan : सरकारलाही जुमानत नाही बॅंका, आदेश टाकला धुळीत !

काम केल्यानंतर दोन वर्षे देखभाल दुरुस्तीचा खर्च कंत्राटदाराला करावा लागणार होता. जलवाहिनीच्या तक्रारी केल्या; मात्र याकडे संंबंधित अधिकारी, प्रशासनाच्यावतीने दुर्लक्ष करण्यात येत आहे. ग्रामपंचायतकडून पंधराव्या वित्त आयोगामधून आतापर्यंत पाइपलाइन दुरुस्तीसाठी तब्बल अडीच लाखांचा वैयक्तिक खर्च करण्यात आला. मात्र ज्यांनी हे काम केले त्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीसाठी छदामही यावर खर्च केला नाही, हे विशेष.