Dussehra Festival Event : आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या भूमिकेकडे लक्ष !

Attention Turns to MLA Dr. Ashish Deshmukh’s Role : उद्या सावनेर येथे दसरा मेळाव्याचे आयोजन

Nagpur : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. उबाठाने दसरा मेळाव्यावर खर्च न करता, ती रक्कम अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून द्यावी, असा उपरोधिक सल्ला भाजपने दिला आहे. तर कुठल्याही परिस्थितीत दसरा मेळावा होणारच. भाजपने ‘देवा भाऊ’च्या ज्या जाहिराती केल्या, तेवढी रक्कम अतिवृष्टीग्रस्तांना द्यावी, असा उलट सल्ला उबाठाने भाजपला दिला आहे. या पृष्ठभूमीवर नागपूर जिल्ह्याच्या सावनेर येथील आमदार डॉ. आशिष देशमुख यांचा दसरा मेळावा चर्चेत आला आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये पराक्रमाचे प्रतिक असलेल्या विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाला भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीतर्फे आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात उद्या (२ ऑक्टोबर) सायंकाळी सावनेरच्या नगर परिषद मैदानावर दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती, राज्यातील घडामोडी, नागपूर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा यावर डॉ. देशमुख विचार मांडणार आहेत. यावेळी ते राजकारणावर नेमकी काय भूमिका मांडतील, याकडे सावनेर विधानसभा मतदारसंघासह नागपूर जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

Pankaj Bhoyar : अहिल्यानगरमधील परिस्थिती नियंत्रणात, अफवांवर विश्वास ठेऊ नका !

दसरा मेळाव्याला भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, जिल्हा उपाध्यक्ष रामराव मोवाडे, सावनेर शहर अध्यक्ष मंदार मंगळे, शहर महामंत्री तेजस्वीनी लाड, महामंत्री रितेश सुर्यवंशी यांची उपस्थिती राहणार आहे. सावनेरमध्ये भाजपकडून प्रथमच असा मेळावा होत असल्याने जनतेचे त्याकडे लक्ष लागलेले आहे.