E-certificate of property will be distributed by Prime minister of India: पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार वितरण
Akola देशभरातील 50 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार, दि. 18 जानेवारीला ई-सनद वितरित केली जाणार आहे. त्यानुसार, जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील घरमालकांना त्यांच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून सनद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. नियोजन भवन येथे सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पश्चिम विदर्भातील १४९ गावांमध्ये या सनदांचे वाटप करण्यात येईल. मिळकत पत्रिका (पीआर कार्ड) तयार झाल्यामुळे घरमालकांना आता विविध लाभ उपलब्ध होतील.
MNS leader Amol Patil : पीक कर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकांची खैर नाही
विभागात या योजनेअंतर्गत ड्रोनच्या साहाय्याने मालमत्तांचे जीएसआय मॅपिंग करण्यात आले आहे. ग्राम विकास विभाग, भूमी अभिलेख कार्यालय आणि सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे राज्यात ही योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रगत नकाशांकन तंत्रज्ञान आणि ड्रोनचा उपयोग केला जात आहे.
शनिवारी विभागातील गावस्तर ते जिल्हा स्तरापर्यंत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात स्वामित्व योजनेची सविस्तर माहिती दिली जाईल, तर बँक अधिकारी कर्जविषयक माहिती नागरिकांना देतील.
Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 पुन्हा दावोसमध्ये
स्वामित्व योजनेचे फायदे
मिळकतीचा नकाशा तयार करून तो घरमालकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे मालमत्तेचा पुरावा म्हणून तिचा वापर करता येईल. मालकीच्या हक्कावरून होणारे वाद, भांडण-तंटे यामुळे कमी होतील. बँक कर्जांसाठी सनद उपयुक्त ठरेल.
५० तालुक्यांत सनद वाटपाचे आयोजन
विभागातील ५० पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये शनिवारी सनद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
अमरावती जिल्हा: १३ तालुक्यांतील ३४ गावांमध्ये वाटप
यवतमाळ जिल्हा: ९ तालुक्यांतील ४४ गावांमध्ये वाटप
अकोला जिल्हा: ७ तालुक्यांतील १२ गावांमध्ये वाटप
बुलढाणा जिल्हा: १३ तालुक्यांतील ५० गावांमध्ये वाटप
वाशिम जिल्हा: २ तालुक्यांतील ९ गावांमध्ये वाटप