व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Earthquake : महाराष्ट्र हादरला; विदर्भ आणि मराठवाड्यात सौम्य भूकंपाचे धक्के !

Earthquake : महाराष्ट्र हादरला; विदर्भ आणि मराठवाड्यात सौम्य भूकंपाचे धक्के !

maharashtra-earthquake-tremors-vidarbha-marathwada-washim-yavatmal-nanded : वाशिम-यवतमाळ-नांदेडमध्ये नागरिकांमध्ये भीती

Mumbai:महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागात आज सकाळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी सुमारे ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास वाशिम शहरासह परिसरात हलके धक्के जाणवले. त्याचवेळी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी भागातही नागरिकांना जमीन हलल्याचा अनुभव आला. यानंतर काही मिनिटांतच नांदेड शहर आणि परिसरात सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी सौम्य धक्का जाणवला.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, भूकंपाच्या वेळी भूगर्भातून आवाज येऊन त्यानंतर जमीन थोड्या वेळासाठी हलल्यासारखी जाणवली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही नागरिक भीतीने घराबाहेर पडले, तर काहींनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. मात्र, काही क्षणांतच परिस्थिती पूर्ववत झाली आणि कोणतीही घबराट राहिली नाही.

Sharad pawar : वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची घुसखोरी

सुदैवाने या सौम्य भूकंपामुळे कोठेही जीवितहानी किंवा वित्तीय नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र यांच्याकडून अद्याप भूकंपाची तीव्रता किंवा केंद्रबिंदू याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. स्थानिकांच्या अनुभवांनुसार हा धक्का अत्यंत सौम्य स्वरूपाचा होता. विदर्भ आणि मराठवाडा हे भूकंपप्रवण क्षेत्र मानले जात असल्याने अशा हलक्या धक्क्यांची नोंद अधूनमधून होत असते.

Sunetra pawar : सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका, रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप !

या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणतीही संशयास्पद माहिती अधिकाऱ्यांना कळवण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!