Breaking

ED notice to Sonia and Rahul Gandhi : पंतप्रधानांकडून सत्तेचा गैरवापर, काँग्रेसचा आरोप!

Congress alleges misuse of power by Prime Minister : बुलढाण्यातही पडसाद; चिखली तहसीलदारांना निवेदन

Buldhana पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांविरोधात सूडबुद्धीने कारवाई केली आहे.‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणातील अंमलबजावणीस विरोध दर्शवत चिखली काँग्रेसने तहसीलदारांना निवेदनाद्वारे तीव्र शब्दात निषेध नोंदवला.

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या सूचनेनुसार चिखली काँग्रेसचे शिष्टमंडळ तहसील कार्यालयात दाखल झाले. निवेदनात म्हटले आहे की, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी धोकादायक असून, भाजप सरकारच्या कारवाया केवळ सूडबुद्धीने प्रेरित आहेत. मोदी सरकारकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम सुरू असून, देशाला हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रकार आहे.

ED notice to Sonia and Rahul Gandhi : सोनिया-राहुल गांधी यांना ईडी नोटीस; अकोल्यात काँग्रेसचे तीव्र आंदोलन

काँग्रेसच्या निवेदनात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचा निषेध करत या कारवायांना तात्काळ आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे. “संविधानप्रिय नागरिक म्हणून आम्ही असे होऊ देणार नाही,” असा ठाम इशारा काँग्रेसने दिला.

Jaljiwan mission : जलजीवन मिशनला खिंडार; निधीचा थेंबही नाही!

या निवेदनावर पुढील नेत्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या:
शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, सचिन बोंद्रे, रिक्की काकडे, भगवानराव खरात, बंडू कुलकर्णी, शिवराज पाटील, प्रदिप पचेरवाल, विजू पाटील शेजोळ, गणेशराव जवंजाळ, गोकुळ शिंगणे, शेख खैरू, कैलास खराडे, भास्कर चांदोरे, गजानन वानखेडे, प्रशांत भटकर, जगन्नाथ वाघ, पंकज सोलंकी, गोपाल म्हस्के, संतोष सोलंकी, सिद्धार्थ मोरे, श्रावण परिहार, लक्ष्मण भिसे, हबीबभाई, भारत खासभागे, संजय गिरी, रामेश्वर भुसारी यांच्यासह काँग्रेसच्या विविध सेल व विभागांचे पदाधिकारी.