Breaking

ED notice to Sonia and Rahul Gandhi : आंदोलनावरून भाजप-काँग्रेस आमने-सामने!

Youth Congress objects to the use of Zilla Parishad rest house by BJYM : जिल्हा परिषद रेस्ट हाऊसच्या वापरावरून युवक काँग्रेस आक्रमक

Amravati नॅशनल हेरॉल्ड National Herald प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आयोजित आंदोलनावरून अमरावतीत राजकीय वातावरण तापले. हे आंदोलन जिल्हा परिषदेच्या रेस्ट हाऊसवरून सुरू झाल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनूप मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. काँग्रेस भवनसमोर राहुल गांधी यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून पुतळा जाळण्याचा इरादा होता. मात्र, पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत हा कार्यक्रम थांबवला आणि आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनूप मोरे, प्रदेश महामंत्री बादल कुलकर्णी, शहर जिल्हाध्यक्ष कौशिक अग्रवाल यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर काही वेळातच त्यांची सुटका करण्यात आली.

Mission-28 Program : अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासन गतिमान

या आंदोलनाला उत्तर देताना युवक काँग्रेसने जिल्हा परिषद प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रेस्ट हाऊसचा वापर भाजयुमोच्या आंदोलनासाठी कसा आणि का झाला, असा सवाल युवक काँग्रेसने उपस्थित केला. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड यांना याबाबत विचारणा केली. यावेळी समीर जवंजाळ, नीलेश गुहे, वैभव देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Sahasram Korote : ‘माजी’ झाले तरी ‘आजी’चा मोह जाईना!

विशेष म्हणजे, सीईओ संजीता महापात्र रजेवरून परतल्यानंतर त्यांच्या पहिल्याच दिवशी या वादाला सामोरे जावे लागले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनावरही याचे सावट पसरले आहे.