Drone eyes on copycats in exams : संवेदनशील परीक्षा केंद्रावर व्यवस्था; बोर्डाने घेतला निर्णय
Gondia Salekasa इयत्ता १० वी १२ वी बोर्डाची परीक्षा काॅपीमुक्त, भयमुक्त वातावरणात पार पाडणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेत शालेय शिक्षण विभागाने काॅपीमुक्त अभियान राबविण्यासाठी परीक्षा मंडळाला सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्याचा निर्णय घेतला आहे. जे परीक्षा केंद्र संवेदनशील किंवा उपद्रवी परीक्षा केंद्र आहेत, त्या प्रत्येक परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार आहे, असे निर्देश बोर्डाने जारी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते ३ मार्च आणि दहावी बोर्डाच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहेत. या परीक्षेदरम्यान काॅपीच्या प्रकाराला पूर्णत: प्रतिबंध लावण्यासाठी काॅपीमुक्त अभियान राबविले जाणार आहे. त्याच अनुषंगाने आता संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे परीक्षा केंद्रावर नजर ठेवली जाणार आहे.
Pravin Darekar : मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्याच्या फंदात संजय राऊतांनी पडू नये !
एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का, याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल. सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साह्याने काॅपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथके व बैठकी पथके तयार करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्ती केलेल्या केंद्र संचालक, पर्यवेक्षक, परीक्षेची संबंधित घटकांची फेशियल रिकॉग्निशन सिस्टमद्वारे तपासणी करण्यात येईल. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल.
परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल. परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे, तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात १४४ कलम लागू करण्यात येईल.