Education Department : SQAAF मूल्यांकनाने शिक्षक हैराण!

Teachers across the state are troubled by SQAAF evaluations : राज्यभरात संतापाची लाट; १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

Wardha शिक्षकांना शाळाबाह्य कामांमध्ये गुरफटून ठेवण्याचा प्रकार सुरू आहेच. त्यात आता एखादा आदेश काढायचा. आणि ठराविक कालावधीतच त्याची माहिती अपलोड करायला लावायची, असा प्रकार सुरू झाला आहे. त्यामुळे ‘शिक्षक म्हणजे रिकामटेकडा प्राणी’ अशी शासनाची समजूत होऊन बसली की काय? असा प्रश्न ‘स्कॉफ’ मूल्यांकनाच्या डेडलाइनवरून शिक्षकांकडून उपस्थित व्हायला लागला आहे. इतकेच नाही तर या प्रकारामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाटही दिसून येत आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांना गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (स्कार्फ) २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. सध्या राज्यभरात दहावी, बारावीची परीक्षा सुरू आहे. त्यामुळे शिक्षक या परीक्षांमध्ये गुंतलेले आहेत. याशिवाय परीक्षेच्या इतर नियोजनातही शिक्षक सहभागी आहेत.

Akola Zilla Parishad : अकोला जि.प.चा आरोग्य विभाग राज्यात अव्वल

सोबतच अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून निकाल लावणे आणि प्रवेश प्रक्रिया राबविणे याचीही जबाबदारी या शिक्षकांवर आहे. तसेच ‘एससीईआरटी’ने शालेय शिक्षकांसाठी नियोजित केलेले क्षमतावृद्धी प्रशिक्षण सुरू असल्याने अनेक शिक्षक या प्रशिक्षणात व्यस्त आहे. अशा स्थितीत आराखडा भरताना शिक्षकांची फरफट होत असून, सध्या ‘स्कॉफ’चे भूत मानगुटीवर बसल्याचा संताप व्यक्त होत आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून १२८ मुद्द्यांवरील माहिती शाळांकडून मागविण्यात आली आहे. शाळांमध्ये झालेली चर्चासत्रे, इयत्तानिहाय झालेल्या पालक सभा, वार्षिक नियोजन, खेळातून शिक्षण, कथाकथन, अध्ययन निष्पत्तीवर आधारित उपक्रम, वृक्षारोपणासारखे उपक्रम, ई-लर्निंग साहित्याचा वापर आदीचा समावेश आहे. त्यामुळे शिक्षकांना वेळ कमी पडणार असल्याचे शिक्षक संघटनांकडून सांगण्यात आले असून, याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Udhhav Balasaheb Thakrey : आरोपींना फाशीची शिक्षा द्या; शिवसेनेचे आंदोलन

राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षातर्फे राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात शाळांनी स्वयंमूल्यमापन करणे अपेक्षित आहे. त्यासाठी एससीईआरटीने मूल्यमापन पूर्ण करण्याकरिता आता १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच त्यासाठी मार्गदर्शनपर व्हिडीओची मागणीही केली आहे. त्यामुळे हे सर्व कसरत करताना शिक्षकांची गळचेपी होत आहे.

शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा स्कॉफ (SQAAF) मध्ये प्राथमिक शाळांना ६ क्षेत्र, उपक्षेत्र ५९, परिशिष्ट ८, मानके १२८, प्रत्येकाचे ४ स्तर (प्रारंभिक १ गुण, प्रगतशील २ गुण, प्रगत ३ गुण, प्रवीण ४ गुण) अशाप्रकारे आवश्यक पुरावे फोटो अपलोड करून माहिती भरायची आहे.

RTE admission : खासगी शाळांना परवडेना आरटीईचे प्रवेश!

यापूर्वी सुद्धा शाळा सिद्धीसारखे मूल्यांकनाचे खूप प्रयोग झाले. प्रचंड माहिती गोळा केली. यू-डायस प्लस आणि अशा वेगवेगळ्या उपक्रमातून नियमित माहिती भरल्या जाते; पण या माहितीचे पुढे होते काय, हा संशोधनाचा प्रश्न आहे. ऐन परीक्षेच्या तयारीच्या महिन्यात शाळेतील सर्वच शिक्षक प्रशिक्षणावर असल्याने शाळेतील दैनंदिन अध्यापन कार्य कोलमडले आहे. अशाप्रकारचे प्रशिक्षण शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला घेण्यात काय अडचण आहे, हेच कळायला मार्ग नाही.

आता अभ्यासाच्या दिवसात शाळेत शिक्षक नाही आणि मग गुणवत्तेच्या नावाने बोंबा मारायच्या व शिक्षकाला बदनाम करायचे, हे धोरण चुकीचे आहे. इतकी सारी माहिती गोळा करून कोणतं मूल्यांकन करणार आणि आराखड्याचं पुढे काय करणार, हे कळायला मार्ग नाही. प्रत्येक गोष्टीचा पुरावा आणि कोणतीही सुविधा नसताना सर्व माहिती ऑनलाइन भरण्याने काय साध्य होणार? शिक्षक अशा प्रकारच्या उपक्रमामुळे त्रस्त झाले आहेत.