Education Department : शाळेत जायची सोय नाही, विद्यार्थ्यांनी अडवली एसटी!

Students staged a protest by blocking ST bus : शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप, वडाळी येथे धरणे आंदोलन

Nandura ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्यापही शासकीय सेवांमध्ये भेडसावणाऱ्या अडचणी स्पष्ट होत आहेत. नांदुरा–पिंपळगाव राजा मार्गावरील वडाळी परिसरातील विद्यार्थ्यांचे मागील महिनाभरापासून एसटी बसच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. अखेर संतप्त विद्यार्थ्यांनी ८ सप्टेंबर रोजी सकाळी पिंपळगाव ते नांदुरा धावणारी एसटी बस अडवून धरणे आंदोलन केले.

या मार्गावरील वडाळी, बरफगाव, घाणेगाव, वसाडी, वळती, ज्ञानगंगापूर, धानोरा, वडगाव आदी पंधराहून अधिक गावांतील शेकडो विद्यार्थी दररोज नांदुरा शहरात शिक्षणासाठी जातात. मात्र वडाळी येथे बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना वारंवार पायी परतावे लागते किंवा पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण धोक्यात आले असून त्यांची स्वप्ने अपूर्ण राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Local Body Elections : सर्कलनिहाय बैठकांचा सपाटा; जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाची पहिली कसोटी!

गेल्या महिनाभरापासून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी नांदुरा एसटी डेपो येथे वारंवार जादा बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र शासन आणि एसटी महामंडळाकडून केवळ आश्वासने मिळाली, प्रत्यक्षात काहीही उपाययोजना झाल्या नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

स्थानिक पालक व गावकऱ्यांनीही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. शासनाने ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सुविधा पुरवल्या नाहीत तर आगामी काळात या प्रश्नाचे मोठे राजकीय आंदोलन उभे राहू शकते, अशी स्पष्ट भूमिका स्थानिक नेतृत्वाने घेतली आहे.

Chandrashekhar Bawankule : वडेट्टीवारांनी आम्हाला सांगावे, उपसमिती त्यावर निर्णय घेईल !

एसटी सेवा ही ग्रामीण भागातील जनतेसाठी जीवनरेषा मानली जाते. तरीही विद्यार्थ्यांना प्रवासाची मूलभूत सोय नाकारली जात असल्याने राज्य सरकारच्या शिक्षणाबाबतच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ अतिरिक्त बससेवा सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी ठाम मागणी पालक व विद्यार्थ्यांनी केली आहे.