Demand the action against education officer : भारतीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
Buldhana शिक्षण क्षेत्रात गंभीर गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत. मात्र, गट शिक्षण अधिकारी रमेश रतन डुकरे पाटील यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. परंतु प्रशासनाने अद्यापही मौन सोडलेले नाही. यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, खरे दिव्यांग उमेदवार डावलून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून रमेश डुकरे यांनी शासकीय शिक्षण विभागात पदे मिळवली. पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेत लाखो रुपयांची आर्थिक देवाणघेवाण करून अनेकांना नियमानुसार नियुक्त न करता जबाबदारी स्विकारली.
load shedding : ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची महावितरणच्या कार्यालयात धडक
या सगळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून शिक्षण सेवकांच्या बेकायदेशीर नियुक्त्या रद्द कराव्यात आणि संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, अशी ठाम मागणी आहे. या प्रकरणी शिक्षण अधिकारी प्राथमिक बाळासाहेब खरात यांनी लेखी आश्वासन दिले असतानाही तीन आठवड्यांनंतरही कारवाई नाही. उलट, गट शिक्षण अधिकाऱ्याच्या बाजूने भूमिका घेण्यात येत आहे, असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.
प्रशांत डोंगरदिवे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “फक्त नोटीस देऊन विषय थातूरमातूर केला गेला. कारवाई टाळण्यासाठीच राजकीय दबाव टाकला जात आहे. संबंधित अधिकाऱ्याचा सीडीआर (फोन रेकॉर्ड) तपासून राजकीय आश्रयदात्यांचा पर्दाफाश करावा,” अशी मागणी त्यांनी केली.
Bacchu Kadu : बच्चू कडूंसह चार सहकाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा
या उपोषणाला सम्राट सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आशिष बाबा खरात, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र जैन, माजी जि.प. सदस्य ऍड. सुमित सरदार, शहर अध्यक्ष मिलिंद वानखेडे, तसेच शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंच, शेतकरी नेते, आणि इतर अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.जिल्हा प्रशासनावर दबाव वाढत असताना, अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने उपोषणकर्त्यांमध्ये रोष वाढत आहे.