Breaking

Education in rural : बुलढाण्यातील १३० अंगणवाड्या स्मार्ट!

130 Anganwadis in Buldhana are smart : शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा; बालविकास विभागाचा उपक्रम

Buldhana जिल्ह्यातील बालकांसाठी शिक्षण अधिक प्रभावी आणि आकर्षक करण्याच्या उद्देशाने १३० अंगणवाड्या स्मार्ट करण्यात आल्या आहेत. भिंतींवर रंगीत आणि बोलकी चित्रे रेखाटून, खासगी नर्सरी शाळांप्रमाणे आधुनिक पद्धतीने शिकवणी दिली जात आहे. महिला व बालविकास विभागाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जात आहे.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. दरवर्षी १०० अंगणवाड्यांना स्मार्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बोलक्या भिंतींवर बाराखडी, अंकमालिका आणि इंग्रजी अक्षरांसह रंगीत चित्रे आहेत. तर डिजिटल शिक्षण सुविधेंतर्गत एलईडी स्क्रीन आणि अन्य डिजिटल शिक्षण साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी Good News!

मुलांसाठी मूलभूत सुविधांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, बसण्याची उत्तम व्यवस्था, खेळण्याची साधने आहेत. व्यापक सुधारणांतर्गत शारीरिक व बौद्धिक विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधून प्रत्येकी १० अंगणवाड्यांची निवड करून त्यांना स्मार्ट करण्यात आले आहे. परिणामी, सरकारी अंगणवाड्याही खासगी नर्सरी शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षण देऊ लागल्या आहेत.

Forest Department : वन्यजीव संरक्षणासाठी ‘तिसरा डोळा’!

जिल्ह्यातील १३० अंगणवाड्या स्मार्ट करण्यात आल्या असून, पिण्याचे पाणी, बसण्याची सुविधा आणि दर्जेदार शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. दरवर्षी १०० नवीन अंगणवाड्यांना स्मार्ट करण्याचे नियोजन आहे, असं जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यंडोले यांनी सांगितले.