Teachers’ unions warn of agitation : प्रशासनाला निवेदन, ८ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा
Buldhana शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या अन्यायकारक अटकेच्या निषेधार्थ राज्यातील शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. १ ऑगस्ट रोजी एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन पुकारून, बुलढाणा जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
बोगस शालार्थ आयडी प्रकरणामुळे शिक्षण प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना विनाचौकशी अटक करण्यात आली असून, याला संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. “चोर सोडून संन्याशाला फाशी” अशी परिस्थिती निर्माण करण्यात तपास यंत्रणा जबाबदार असल्याचा थेट आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
Revenue Department : 13 हजार प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी विशेष मोहिम
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधित अधिकाऱ्यांनी नेहमीच शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी प्रामाणिकपणे केली असून, कुणाही अधिकाऱ्यांवर दोष असल्यास नियमानुसार विभागीय चौकशीचा मार्ग अनुसरावा. विनाचौकशी अटकेपासून संरक्षण देणारी लेखी हमी शासनाने द्यावी, एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकांवर सही केली जाणार नाही, तसेच अतिरिक्त सुट्टीच्या दिवशी लादले जाणारे अतिरिक्त कामकाज कमी करावे, अशा प्रमुख मागण्या या निवेदनातून मांडण्यात आल्या.
Sanatani Terrorism : ‘ सनातनी दहशतवाद’ वक्तव्यावरून राजकीय वाद पेटला !
या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास येत्या ८ ऑगस्टपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा देखील संघटनेने दिला आहे. या निवेदनावर शिक्षणाधिकारी माध्यमिक अनिल अकाळ, शिक्षणाधिकारी योजना डॉ. वैशाली ठग, उपशिक्षणाधिकारी ए. पी. देवकर, वेतन पथक अधीक्षक ए. जी. निवाळकर, प्रकाश कुळे, ए. के. वाघ यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या आंदोलनाला राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातीलही लक्ष लागले असून, शिक्षण यंत्रणेमधील असंतोष उफाळून येण्याची चिन्हे आहेत. सरकारने तात्काळ सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी राज्यभरातून होत आहे.