Breaking

Eknath Shinde : राज यांच्या भाषणात तळमळ पण उद्धवच्या भाषणात मळमळ दिसली !

DCM finds Uddhav Thackera’s speech boaring : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंची सावध टीका

Mumbai : हिंदी सक्तीचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंनी एकत्र सभा घेतली. या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू 19 वर्षांनी एकत्र आले. त्यामुळे आता आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेमकं काय होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी विषयीची तळमळ दिसली पण उद्धव ठाकरेंच्या भाषणात सत्तेची, स्वार्थाची मळमळ दिसली, असा हल्लाबोल शिंदे यांनी केला. तसेच मराठी माणसांचा अपेक्षाभंग झाला आहे, असे म्हणत टीका केली.

आजचा मेळावा हा मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी असल्याचे सांगितले होते. पण उद्धव ठाकरे यांच्या भाषणात आगपाखड होती. द्वेष, जळजळ, मळवळ होती. हे सगळं त्यांच्या भाषणात दिसून आलं. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का फेकला गेला? मुंबईतील मराठी लोकांचे प्रमाण का कमी होत गेले. मराठी माणूस वसई-विरार, नालासोपारा, बदलापूर, अंबरनाथ, वांगणी इथपर्यंत का बाहेर गेला? असा सवाल शिंदे यांनी केला.

Sanjay Raut vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील कच्चं मडकं, संजय राऊत कडाडले

 

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले की, राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी माणसासाठी तळमळ दिसली. तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्ता आणि खुर्चीसाठीची मळमळ दिसली, उद्धव ठाकरे माझ्यावर सातत्याने टीका करत असतात. पण मी त्यांच्या टीकेला उत्तर देत नाही. मी कामातून उत्तर दिलं. त्यामुळेच मी मुख्यमंत्री झालो. अडीच वर्षांनी झालेल्या निवडणुकीतही आमचा मोठा विजय झाला, अशी उदाहरणं देत जनतेने उद्धव ठाकरेंना नाकारलं असं शिंदेंनी सांगितलं.

Jai Gujarat controversy : चूक नाही – मुख्यमंत्री, केम छो साहेब- आव्हाड, हा मंत्रिमंडळात कसा? – राऊत

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. यावर बोलताना मराठी भाषेला आम्ही अभिजात दर्जा मिळवून दिला. आमच्या मागणील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लगेच होकार दिला. त्या मोदींनाही उद्धव ठाकरे यांनी सोडले नाही. हे दुर्दैवी आहे, असे शिंदे म्हणाले. तसेच यातून त्यांची वृत्ती, त्यांची पोटदुखी दिसून आली. त्यांची लाचारी दिसून आली, असा टोलाही लगावला.

Eknath Shinde : शिंदेसेनेत गुंडाचा प्रवेश; चुकून प्रकार घडल्याचा दावा

तीन वर्षांपूर्वी 2022 साली आम्ही उठाव केला होता. अन्यायाच्या विरोधात आम्ही एकत्र आलो. तेव्हा ते आडवे झाले. तेव्हापासून ते सावरलेच नाहीत. ते आडवेच आहेत. त्यामुळे कोणाचातरी हात पकडून ते परत उठवण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत आहेत, अशी टीका शिंदेंनी केली. ठाकरे बंधन यांच्या युतीबद्दल बोलताना ते म्हणाले की,लोकशाहीमध्ये कोणालाही कोणासोबतही युती आणि आघाडी करण्याचा अधिकार आहे. निवडणुका जशा जवळ येतील, तशा अनेक घटना दिसतील. त्यामुळे मी सर्वांनाच शुभेच्छा दिल्या आहेत. असेही ते म्हणाले.

____