Don’t waste our success by saying wrong things, Eknath Shinde ; आपण एवढं मोठं यश मिळवलं ते चुकीचं बोलून घालवू नका
Mumbai : तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणतो. आपण एवढं मोठं यश मिळवलं ते चुकीचं बोलून घालवू नका, अशा कानपिचक्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांना दिल्या आहेत. कमी बोलू आणि जास्त काम करु तेवढं चांगलं असल्याचे शिंदे म्हणाले. विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एस्पोज होऊ नका. शिस्तीला तडा जाईल असं काहीच करु नका. केलेल्या कामांची ‘ ब्रेकिंग न्यूज’ व्हायला पाहिजे असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेसाहेबांनी शाखेचं जाळं घट्ट केलं आहे. शाखा लोकांना आधार वाटतो. कंटेनर शाखेचा कॉन्सेप्ट ठिकठिकाणी राबवा असेही शिंदे म्हणाले. ‘घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा’ ही झाली पाहिजे. निवडणुकां साठी सज्ज व्हा, निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार हवा असे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवार चुकला की संपलं. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा. प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी उद्दिष्ट ठरवून नोंदणी करावी. मराठी भाषेबाब तडजोड,nगळचेपी सहन करणार नाही. मराठी माणसाच्या उध्दारासाठी जे काही करायचं ते करणार, दिलेला शब्द पाळतो त्यामुळे मराठी माणूस आपल्यासोबत असल्याचे शिंदे म्हणाले.
Devendra Fadnavis : दोन भावांनी एकत्र येऊ नये, असा जीआर आम्ही काढलेला नाही!
एकटा माणूस मोठा होऊन पक्ष मोठा होत नाही. कार्यकर्त्याला मोठं केलं की पक्षही मोठा होतो असे एकनाथ शिंदे म्हणाले. आपल्यात शिवसैनिक हे पद सर्वात मोठं आहे हे लक्षात ठेवा. कार्यकर्ता हा नेता तयार करतो. पक्ष घडवतो, त्यामुळं कार्यकर्त्याला जपले पाहिजे, नेता, आमदार, मंत्री झाला ही हवा डोक्यात जाऊ देऊ नका, कायम कार्यकर्ता म्हणूनच काम करा. शाखाप्रमुखापासून तर मुख्य नेत्यापर्यंत सर्वांनाच निवडणूकीला सामोरे जावे लागणार असल्याच शिंदे म्हणाले.
__