Breaking

Eknath Shinde : आगामी निवडणुकीत ठाकरे बंधूंचा प्रभाव रोखण्यासाठी रणनीती !

Eknath Shindes sudden visit to Delhi for reporting on Thackeray brothers collation : अमित शहांना ‘ ठाकरे ब्रँडच्या’ रिपोर्टिंग साठी, एकनाथ शिंदेंची अचानक दिल्लीवारी

Mumbai : राज्यात सध्या पावसाळी अधिवेशनाची धावपळ सुरू आहे. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, अचानक दिल्लीवारी केली. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. यात त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन, महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय वातावरणात, उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले तर ‘ठाकरे ब्रँडचा’ आगामी निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो यावर मंथन झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः मुंबई महापालिकेचा निवडणुकी त नेमका काय परिणाम होणार, याबाबत भाजपकडून सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात मराठीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले, आणि विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद बुधवारी संध्याकाळी अचानक दिल्लीत गेले. दिल्लीत त्यांनी अनेक वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आली. देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांचीही एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. या नेत्यांमध्ये गुप्त राजकीय खलबते झाली. यावेळी अमित शाह यांनी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा नेमका प्रभाव कितपत आहे, याविषयी माहिती जाणून घेतल्याची सूत्रांकडून चर्चा आहे.

Manoj Jarange : आरपारची लढाई, तिसर्‍या दिवशी आरक्षणाचा गुलाल !

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात. त्यामुळे इलेक्शन मोडमध्ये असणारा आणि सतत राजकीय डावपेच आखणारा भाजप पक्ष सावध झाला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यास महाराष्ट्रात महायुतीला किती फटका बसू शकतो, याचे अंतर्गत सर्वेक्षण भाजपने करवून घेतले आहे. त्या सर्व्हेत नेमकी काय माहिती समोर आली, हे अमित शाहांनी शिंदेंना सांगितल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांना कसे रोखायचे? त्यासाठी वेळ पडल्यास मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणखी लांबणीवर टाकायच्या का, त्याचे काय परिणाम होतील, या सगळ्याबाबत अमित शाह आणि शिंदे यांच्यात खल झाला. तसेच ठाकरे बंधूंना थेट आव्हान दिले आणि लक्ष्य केले तर त्यामुळे मराठी मतदारांमध्ये काय प्रतिक्रिया उमटेल? मराठी-हिंदी वादामुळे मुंबईतील अमराठी मतदारांचे ध्रुवीकरण होऊन ते महायुतीच्या पाठीशी उभे राहतील का? याचे विश्लेषण भाजपमध्ये सुरु आहे.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : ‘फ्री होल्ड’ : प्रवीण दटके म्हणाले, अधिवेशन संपायच्या आत निर्णय द्या !

गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीमधील अंतर्गत वादाच्या काही घटना समोर आल्या. याबाबतही दिल्लीत अमित शाह आणि शिंदेंच्या बैठकीत चर्चा झाल्याचे शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाच्या काही आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गदारोळ झाला होता. याबाबत भाजपने दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. त्यामुळे अमित शाह यांनी, महापालिका निवडणुकीपर्यंत हे प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्या. महायुती एकसंध आहे, हा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे, अशी सूचना एकनाथ शिंदे यांना केल्याची शक्यताही व्यक्त होत आहे. दरम्यान शिंदे गटांच्या मंत्र्याला आयकर विभागाची नोटीस आलेली आहे. यासंदर्भातही ही भेट असावी अशी ही शक्यता व्यक्त केली जात आहे.