DCM attacks on Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर प्रहार; ‘लाडका भाऊ’ हेच माझ्यासाठी मोठं पद
DCM attacks
Deori मागील अडीच वर्षात महायुती सरकारने प्रचंड काम केले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर देत आहोत. लाडक्या बहिणींनी विरोधकांना जागा दाखवली. फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना तर घरीच बसवले, असा प्रहार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर चढवला. त्याचवेळी माझ्यासाठी ‘लाडका भाऊ’ हेच मोठं पद आहे, असंही ते म्हणाले.
देवरी येथे शुक्रवार 21 रोजी आयोजित माजी आमदार सहशराम कोरोटे व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश व शिवसेना कार्यकर्ता मेळावा याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कॅबिनेट मंत्री संजय राठोड,आ.नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार सहशराम कोरोटे, मनोहर चंद्रिकापुरे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र नायडू, मुकेश शिवहरे तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
Board Exam : वडिलांच्या मृतदेहाला नमस्कार करून मुलगा गेला दहावीच्या पेपरला!
लाडक्या बहिणींनी निवडणुकीत सावत्र भावांना जागा दाखवली. फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना घरी बसवले. कोणत्याही पदापेक्षा २ कोटी ३९ लाख लाडक्या बहिणींचा ‘लाडका भाऊ’ हे पद सर्वांत मोठं आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सर्वसामान्य जनतेने आमच्यावर विश्वास दाखविला आहे. त्या विश्वासाला मी एकनाथ शिंदे तडा जाऊ देणार नाही. गोंदिया जिल्ह्याच्या विकासाकरिता मी कटिबद्ध आहे. शिंदे यांच्या उपस्थिती अनेकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. आतापर्यंत तुम्ही आमच्यासाठी काम केलीत. परंतु आता तुम्हाला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत पद मिळवून देण्याची जबाबदारी ही एकनाथ शिंदेची आहे, असा शब्दही त्यांनी दिला.
Siddharth Kharat, Sanjay Raimulkar : आजी-माजी आमदार एकाच व्यासपीठावर!
हीच आजची ब्रेकिंग न्यूज
‘महायुतीचा जोड हा फेविकॉल पेक्षा मजबूत आहे. ही युती कधीही तुटणार नाही. देवेन्द्रजी, अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यात कधीही मतभेद नव्हते व होणारही नाहीत. हीच आजची ब्रेकिंग न्यूज आहे, असंही ते म्हणाले.