Ladki Bahin scheme will not be discontinued under any circumstances : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द, विकास हाच अजेंडा असल्याचा दावा
Buldhana “कुणीही ‘लाल’ आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. काही लोक अफवा पसरवतात; त्याकडे लक्ष देऊ नका. सभांमध्ये दिसत असलेली महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लक्षात घेऊन लाडक्या बहिणी नक्कीच पाठीशी उभ्या राहतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“आम्ही प्रगतीचा निर्धार केला आहे. विकास हा आमचा एकमेव अजेंडा आहे. बुलढाणा विधानसभेसाठी आतापर्यंत तीन हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. बुलढाणा शहर आदर्श बनवण्यासाठी तुमची साथ हवी आहे, आणि ती निश्चित मिळेल,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्यातील सभेत स्पष्ट केले.
Local body election : मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं !
बुलढाणा नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
Local body election : निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेशन; ‘हमाम में सब नंगे हैं’
शिंदे म्हणाले- “आरोप-प्रत्यारोप करणे आमचे काम नाही. आम्हाला फक्त विकासाचे राजकारण हवे आहे. त्यामुळे नगरविकास विभागाकडून लागेल तेवढा निधी देण्याची हमी देतो.” महायुतीला विधानसभेत मिळालेल्या २३२ जागांचा उल्लेख करत त्यांनी नगरपरिषद निवडणुकीतही तितकीच साथ देण्याचे आवाहन केले.
शिंदे यांनी महिलांबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. “शहरी बचत गटातील महिलांना खेळते भांडवल देण्याचा निर्णय मी नगरविकास मंत्री म्हणून घेणार आहे,” असे ते म्हणाले.








