Meetings of top BJP leaders, discussions in political circles : भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी, राजकीय वर्तुळात चर्चां
Mumbai : मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदेंनी काल अचानक दिल्ली दौरा केला यावेळी त्यांनी केंद्रातील अनेक बड्या नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. अधिवेशन सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गुपचूप दिल्ली गाठली. दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या गाठीभेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटीमागचं कारण गुलदस्त्यात आहे. शिंदेंनी अचानक केलेल्या या दिल्लीवारी मुळे नेत्यांच्या भुवया उंचावल्याचं दिसून येत आहे. दरम्यान नियोजित कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांना आणि इतर नेत्यांना पाठवल्याची माहिती आहे. तर या दौऱ्याची चर्चा सध्या राजकीय क्षेत्रात सुरू आहे. मात्र यागचं कारण स्पष्ट झालेली नाही.
एकनाथ शिंदे बुधवारी दिल्लीचा दौरा केला. त्यांनी केंद्रातील अनेक बड्या नेत्यांशी भेट घेतली. मात्र, ही दिल्लीवारी आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटीमागचं नेमकं कारण समोर आलेली नाही. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू असताना आणि अनेक महत्त्वाची विधेयकं मांडली जात असताना हा दिल्ली दौरा झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपले अनेक पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केले आणि त्याऐवजी उदय सामंत किंवा इतर नेत्यांना पाठवले. या भेटीगाठी आणि अचानक केलेल्या दौऱ्यामागचं कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र तर्क वितर्क लढवण्यात येत आहेत .
___