Mungantiwar’s contribution is great in conservation of forts and temples : समाज आणि राष्ट्रनिर्माणात गायत्री परिवाराची भूमिका महत्त्वाची
Mumbai : गायत्री परिवारातर्फे आयोजित कार्यक्रम प्रेरणादायी आहे. गायत्री परिवार समाजात परिवर्तन आणण्याचे काम करतो. आमच्या सरकारचाही हाच प्रयत्न आहे. आमच्या सरकारने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील गडकिल्ले, मंदिरांच्या संवर्धनात आमचे सुधीरभाऊ मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी मोठे काम केले आहे. तसेही सुधीरभाऊ चांगल्या कामात नेहमीच पुढे असतात, असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
रविवार, दि. २३ मार्चला मुंबईत गायत्री परिवारातर्फे आयोजित दिव्य अखंड दीप शताब्दी सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ते म्हणाले, गेल्या अडीच वर्षात आम्हाला कमी वेळ मिळाला. त्यामध्ये जितके जास्त काम करू शकलो, तेवढा प्रयत्न आम्ही केला. त्यामुळे आमच्या सरकारला आशीर्वाद मिळाला. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आम्ही सर्व महाराष्ट्राच्या सेवेत लागलो आहोत.’
Eknath Shinde : मुंबई-पुण्यात उबाठा तर रायगडात शरद पवार गटाला खिंडार !
यावेळी मंचावर राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आचार्य डॉ. चिन्मय पंड्या, आमदार मिहीर कोटेचा आदींची उपस्थिती होती.
सुधीरभाऊ कर्ताधर्ता..
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागच्या वर्षीही नवी मुंबईत अश्वमेध यज्ञाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सरकारच्यावतीने आम्हीही योगदान दिले. सुधीरभाऊंनी तेव्हाही हिरीरीने सहभाग घेतला आणि भव्यदिव्य अश्वमेध यज्ञ आयोजित केला. त्याचे कर्ताधर्ता आमचे सुधीरभाऊ होते. चांगल्या कामांत ते नेहमी पुढे असतात. सुधीरभाऊंमुळे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत मलाही तेव्हा त्या सोहळ्यात सहभागी होण्याचे सौभाग्य लाभले. या यज्ञाने नवी मुंबईची भूमी पावन झाली. लोकांवर सामाजिक, आध्यात्मिक प्रभाव टाकला.
Sudhir Mungantiwar : विधानसभा अध्यक्ष म्हणाले, मुनगंटीवार यांच्या मुद्द्यात मेरीट आहे !
विचार आणि क्रांतीचे आंदोलन..
आज दिव्यज्योती कलश पुजन होत आहे. अशा धार्मिक आणि पवित्र कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. अखिल विश्व गायत्री परिवार एक वैश्विक आध्यात्मिक आणि सामाजिक संघटन आहे. हा परिवार विचार आणि क्रांतीचे आंदोलन आहे.