Breaking

Eknath Shinde : खुर्चीच्या मोहासाठी कोणतीही तडजोड करणार नाही

Positive about increasing the money of Ladki Bahin Scheme : उपमुख्यमंत्री शिंदे यांचा बहिणींना शब्द; योजनेचे पैसे वाढविण्याचा विचार

Mumbai खुर्चीच्या मोहासाठी कोणतीही तडजोड करणार नाही. लाडकी बहिण योजनेत जी काही वाढ करायची आहे त्याचं नियोजन आमच्या डोक्यात आहे. सरकार त्याबाबतीत सकारात्मक आहे. त्याचा योग्य वेळी योग्य निर्णय होईल, असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे DCM Eknath Shinde यांनी लाडक्या बहिणींना दिला.

लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. लाडकी बहीण योजना बंद करणार असे विरोधक म्हणत असले तरीही ही योजना कधीही बंद होणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेना महिला आघाडीने आयोजित केलेल्या शिवदुर्गा सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

Harshwardhan Sapkal : आजपर्यंत महिला सरसंघचालक का झाल्या नाहीत?

सरकार लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी देणार असे विचारणाऱ्यांनी निवडणुकीत ३००० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण मतदारांनी त्यांना घरी बसवले, अशी टीकाही शिंदे यांनी केली.

धनुष्यबाण गहाण ठेऊन शिवसेनेला दावणीला बांधण्याचे काम होत होते. म्हणून अडिच वर्षांपूर्वी उठाव केला, असं ते म्हणाले. शिवसेनेने ८० जागा लढल्या आणि ६० जागा जिंकल्या. यावरुन खरी शिवसेना कोणाची हे निवडणुकीत मतदारांनी दाखवून दिले. नंतर निवडणूक आयोगाने घोटाळा केला, इव्हीएमने घोटाळा केला अशी ओरड सुरू झाली, असा टोला त्यांनी ठाकरे गटाला Uddhav Balasaheb Thackeray लगावला.

CM Devendra Fadnavis : ‘एआय अनझीप्ड’ पुस्तकामुळे कार्यक्षमता वाढेल

ज्यांना लाडकी बहिण मानले, त्या शिवदुर्गा आहेत. त्यांना वंदन करायला आज लाडका भाऊ आला आहे, अशी भावना शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. ‘ज्याच्या पाठिशी बहिणीची माया त्याचे जीवन नाही जात वाया’, असं ते म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ६० व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित महिलांनी औक्षण केले. तसेच ज्येष्ठ महिलांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दृष्ट काढण्यात आली.