Shinde’s direct interaction with office bearers and workers tomorrow : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बुलढाण्यात
Buldhana राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार दौऱ्याअंतर्गत २७ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने आभार सोहळ्याचे आयोजन स्थानिक जिजामाता क्रीडासंकुलाशेजारील मोकळ्या मैदानावर करण्यात आले आहे. यावेळी सुमारे सात हजार नागरिकांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे.
यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती आमदार संजय गायकवाड यांनी २५ एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
आमदार. गायकवाड पुढे म्हणाले की, आभार सोहळ्याबरोबरच स्थानिक विश्रामगृहात शिंदे गटाच्या सर्व जिल्हा प्रमुख व लोकप्रतिनिधींची बैठक होणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संघटनात्मक घडामोडींवर चर्चा करणार आहेत.
Eknath Shinde : निधड्या छातीने आतंकवाद्यांशी भीडला होता काश्मीरी सैय्यद !
या कार्यक्रमासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत, आमदार प्रकाश आबिडकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना, युवा सेना, किसान सेना, अल्पसंख्याक सेना, महिला आघाडी व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. यावेळी शिवसेनेचे युवा नेते मृत्यूंजय संजय गायकवाड, नेते गजेंद्र दांदडे आदींची उपस्थिती होती.
DCM Ajit Pawar : अजितदादांनी भाकरी फिरवली, अकोल्यात मोठा बदल
बुलढाणा जिल्ह्यातील कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने सिंचनाच्या अभावामुळे आत्महत्या केली, ही घटना अजूनही ताजी असताना सरकारने कुठलाही ठोस प्रतिसाद दिलेला नाही, अशी टीका शेळके यांनी केली. “शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, पीकविमा मिळालेला नाही. तरुण पिढी बेरोजगारीमुळे स्थलांतर करत आहे, आरोग्य व शिक्षण व्यवस्था ढासळली आहे, हे वास्तव असूनही सरकार केवळ दौरे करत आहे,” असे त्या म्हणाल्या.