Breaking

Eknath Shinde Shiv Sena : शिवसेनेतील स्थानिक वाद पोलीस ठाण्यात!

Complaint filed regarding burning of posters of leaders : नेत्यांचे पोस्टर जाळल्याप्रकरणी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

Akola अकोला जिल्ह्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांचे पोस्टर जाळून दोन दिवसांपूर्वी हा रोष व्यक्त केला होता. मात्र, आता हा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. यासंदर्भात पोलीस अधिक्षकांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते, अशी आता चर्चा सुरू झाली आहे.

अकोला जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे नारायणराव गव्हाणकर व चंद्रशेखर पांडे गुरुजी यांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामधील चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी काही महिने आधी शिवसेनेचे संपर्क नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. गेल्या आठवड्यात भाजपचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी सुद्धा संपर्क नेत्याच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. एकनाथ शिंदे यांनी त्यांचीही जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली.

Mumbai Elections : उद्धव – राज ठाकरे युतीसाठी देणार नात्याची जोड !

या नियुक्तीने या पूर्वीपासून कार्यरत असलेले जिल्हाप्रमुख अस्वस्थ झाले. त्यानंतर शुक्रवार, दि. २३ मे रोजी त्यांनी शिवसेनेच्या आढावा बैठकीचे आयोजन केले. या बैठकीमध्ये शिवसेनेच्या कार्याचा आढावा घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी संपर्क नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर तथ्यहीन आरोप केले. त्यानंतर मदनलाल धिंग्रा चौकामध्ये नेत्यांचे पोस्टर जाळले.

India – Pakistan : ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, काय म्हणाले परराष्ट्र मंत्री ?

तीनवेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा हा सार्वजनिक अपमान आहे. तथाकथित शिवसैनिकांनी स्वतःच्या कार्यक्षमता उघड झाल्याने अत्यंत खालची पातळी गाठली, असा आरोप करण्यात आला. पोस्टर जाळपोळ करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासाठी जिल्हाप्रमुख नारायणराव गव्हाणकर आणि चंद्रशेखर पांडे यांच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख उषा विर्क, शिवसेनेचे प्रसिद्ध प्रमुख गोपाल नागपुरे, डॉ विजय दुतोंडे, गजानन बोराडे आदींची उपस्थिती होती.