Focus on resolving differences among leaders in East Vidarbha : जयस्वाल-सावंत यांच्यावर जबाबदारी; स्थानिक निवडणुकीसाठी नियोजन
Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमुळे तिनाचे सहा पक्ष उतरणार आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वादही मोठ्या प्रमाणात आहेत. अश्यात शिंदेसेनेला पूर्व विदर्भातील नेत्यांमध्ये असलेल्या अंतर्गत वादांचे टेंशन अधिक आहे. त्यामुळे शिंदेसेनेने मास्टर प्लान तयार केला आहे. त्याचाच भाग म्हणून नव्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेसेनेने पूर्व विदर्भातील नेत्यांमधील मतभेद दूर करून संघटनात्मक बांधणी करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पूर्व विदर्भ संपर्कमंत्री म्हणून वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यावर तर पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख म्हणून माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Local Body Elections : स्थानिक निवडणुकांत तरुणांचा कौल ठरणार निर्णायक
यापूर्वी मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड हे पूर्व विदर्भाचे संपर्कमंत्री होते. आता त्यांच्याकडे पश्चिम विदर्भाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गुरुवारी मुंबई वरळी येथे शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर्गत मतभेद मिटवा तसेच स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांना कुठलीही अडचण असेल तर थेट संपर्कमंत्री व संपर्कप्रमुखांशी संपर्क साधण्याची सूचना केली.
डॉ. दीपक सावंत यांनी यापूर्वीही पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांना येथील पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची ओळख आहे. जमिनीस्तरावर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी पक्षापर्यंत पोहोचाव्या या उद्देशानेच ॲड. जयस्वाल यांच्यासोबत डॉ. सावंत यांच्यावर जबाबदारी सोपविल्याची चर्चा आहे.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा अकोला जिल्ह्याला किती फायदा?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे स्थानिक पातळीवर नियोजन करण्याची जबाबदारी आमदार कृपाल तुमाने व पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन एकूणच तयारीचा अहवाल या नेत्यांना पक्षाकडे सादर करायचा आहे.