Breaking

Eknath Shinde Shiv Sena : शिवसेना शिंदे गटात फेरबदलांनंतर खदखद

Shiv Sena in turmoil after reshuffle in party : जुन्या पदाधिकाऱ्यांचा गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर आरोप; नाराजी पुन्हा उफाळली

Akola आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. मात्र, या फेरबदलांमुळे पक्षात नव्याने खदखद निर्माण झाली असून, जुन्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार तथा जिल्हा संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर थेट आरोप केले आहेत.

शुक्रवारी अकोला येथील जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ही नाराजी खुलेआम व्यक्त करण्यात आली. जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, महानगरप्रमुख योगेश अग्रवाल आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षातील संघटनात्मक बदलांवर चर्चा झाली. या चर्चेत जुने पदाधिकारी व कार्यकर्ते बाजूला सारले गेल्याचा आरोप झाला.

Kharif season : खरीप हंगाम डोक्यावर, कर्जवाटप फक्त १० टक्के

कार्यकर्त्यांनी आरोप केला की, गोपीकिशन बाजोरिया यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून काही वरिष्ठ व निष्ठावान पदाधिकाऱ्यांना डावलले. यापूर्वीदेखील या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना पत्राद्वारे आपल्या नाराजीची कल्पना दिली होती. आता पुन्हा एकदा बाजोरिया यांच्या विरोधात आवाज उठवण्यात आला आहे.

E-bike taxi permission : ई-बाईक टॅक्सीच्या विरोधात ऑटोचालकांचा एल्गार!

माजी आमदारांचा पक्षप्रवेश व त्यानंतर झालेल्या संघटनात्मक बदलांमुळे शिवसेना शिंदे गटात प्रचंड असंतोष पसरल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच उफाळलेली ही नाराजी पक्षासाठी राजकीयदृष्ट्या अडचणीची ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या नाराजीमागे नेमके कोण उभे आहे, तसेच नाराज पदाधिकाऱ्यांना कोण पाठबळ देत आहे, यावरूनही आता पक्षात अंतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत.