Breaking

Eknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत incoming मोठी रांग!

Many lined up for entry into Shiv Sena, Jaiswal-Tumane claim : जयस्वाल-तुमानेंचा दावा; उपमुख्यमंत्र्यांची कन्हानमध्ये आभार सभा

Nagpur पक्षात ‘इनकमिंग’साठी इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. अनेक लोक संपर्कात आहेत, असा दावा राज्याचे अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल Ashish Jaiswal आणि आमदार कृपाल तुमाने Krupal Tumane यांनी पत्रपरिषदेत केला. येत्या २० फेब्रुवारी रोजी कन्हान येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेत काही नेते पक्षात सामील होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) ‘ऑपरेशन टायगर’चा Operation Tiger विदर्भात विस्तार होण्याची शक्यता असल्याचेच संकेत त्यांनी दिले.

२०२४च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयात शिवसेनेचा (शिंदे) निवडणुकीत चांगलाच स्ट्राईक रेट होता. खरी शिवसेना कोणती हे जनतेने निवडणुकीतून दाखवून दिले. विधानसभेत पक्षाचे आता ६० आमदार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सर्व ६० विधानसभा मतदारसंघांत एकनाथ शिंदे यांच्या कृतज्ञता (आभार) सभा आयोजित करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

Chandrashekhar bawankule : कंपनीला द्यावे लागतील 20 लाख रुपये!

विदर्भातील अशा प्रकारची पहिली सभा रामटेक विधानसभा मतदारसंघातील कन्हान येथे २० फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता कन्हान पोलिस ठाण्याजवळील मैदानात होणार आहे. या सभेला काही मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. इतर पक्षांचे अनेक नेते या काळात पक्षात प्रवेश करू शकतात. मात्र, कोणाला प्रवेश द्यायचा हे पक्षाचे नेतेच ठरवतील, असे सांगत जयस्वाल यांनी नाव सांगण्यास नकार दिला.

Agristack Maharashtra Farmer ID Registration : Agristac ५ लाख शेतकऱ्यांना मिळाला Unique ID!

स्थानिक अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेऊन निर्णय घेतला जाईल, पण काहीही होऊ शकते, असे जयस्वाल यांनी सांगितले. महाविकास आघाडीत आता कमालीची नाराजी आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भूमिकेवर साशंकता आहे. अशा स्थितीत महायुती आणि शिंदेसेनेकडे लोकांचे आकर्षण वाढले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाआघाडीच्या रूपात लढवण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले.