Eknath Shinde Shivsena : शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी याचिका

Petition seeking disqualification of corporators who joined the Shinde group : विभागीय आयुक्तांकडे धाव, स्थानिक स्वराज्य संस्थेतील वाद अधिक तीव्र

Akola शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निवडणूक लढविल्यानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या चार नगरसेवकांना अपात्र ठरविण्याच्या मागणीसाठी विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. संबंधित नगरसेवकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आली आहे.

महापालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते विजय इंगळे यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित नगरसेवकांनी पक्षांतर विरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची सदस्यता रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Akola Politics : अकोल्यात युतीत तणाव; शिंदे गटाकडून भाजपवर टीका

दरम्यान, या प्रकरणामुळे महापालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काही नगरसेवकांनी या कारवाईला राजकीय सूडाचे स्वरूप असल्याचा आरोप केला आहे, तर याचिकाकर्त्यांनी ही कारवाई पूर्णपणे नियमांनुसार असल्याचा दावा केला आहे.
विभागीय आयुक्तांकडून याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता असून, या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणात शिंदे प्रवेश करणाऱ्या चार नगरसेवकांनी विशेष सभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील उमेदवार सेवकांना व्हीप बजावली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमका काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.