Breaking

Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकरांच्या युतीची घोषणा

Strategy for prestigious Mumbai Municipal Corporation elections ; प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती

Mumbai: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. हे पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची युती झाली आहे. तशी घोषणा करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुका प्रतिष्ठेच्या होणार आहेत. या पार्श्वभूमीवर युती जाहीर करण्यात आली आहे. मुंबईच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपापल्या पातळीवर युती आघाडी संदर्भात आखणी करत आहेत. यात शिंदे गटाने शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. युती आणि आघाड्यांचे गणित जुळवण्याचा प्रयत्न होत आहे. या वेळी मुंबई माहपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष आहे. ही निवडणूक भाजपा, ठाकरे गट, शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई जिंकण्यासाठी मोठी खेळी केली आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आंदराज आंबेडकर यांच्याशी युती केली आहे.

Tribal Pardhi Society : धक्कादायक.. पारधी समाजाच्या मुलांना शाळेत प्रवेश नाही !

आगामी महापालिकेची निवडणूक लक्षात घेता एकनाथ शिंदे आणि आनंजराज आंबेडकर यांच्यात युती झाली. आता या निवडणुकीत शिंदेची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना हे दोन्ही पक्ष एकाच मंचावर दिसतील. दोन्ही नेत्यांनी अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा केली. युतीची घोषणा केल्यानंतर त्यांनी जागावाटपाचा फॉर्म्यूला काय असेल यावरही भाष्य केलं.

याआधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली होती. नंतर मात्र ही युती टिकली नाही. भविष्यात तुमचीही युती कायम राहील हे कशावरून? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. यावर शिंदे यांनी भविष्यातही आमची युती कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, आम्हाला एकमेकांवर विश्वास आहे. कार्यकर्त्यांचे विचार जुळत आहेत. आम्ही दोघेही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आमच्या महायुतीत कुठेही अडचण येणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Union Bank : विम्यासाठी हिंदीत एफआयआर मागितला, मनसैनिकांचे आंदोलन !

 

ती महाविकास आघाडी होती. ही महायुती आहे. महाविकास आघाडी स्वार्थासाठी होती, असा टोला हिंदी आणि लगावला. आम्ही लोकांच्या कल्याणासाठी एकत्र आलो आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी व्यक्त केले. रिपब्लिकन सेना आणि शिवसेना यांच्यात युती झालेली आहे. एवढ्या लवकर जागावाटपाची चिंता करण्याची गरज नाही. अजून महापालिकेच्या निवडणुकीला वेळ आहे. आम्ही मनाने एकत्र आलो आहोत. त्यामुळे जागावाटपाचा विषय आमच्यासाठी गौण आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.
रिपब्लिकन सेना आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र आली आहे.

_____