Threats have come before, but we are not afraid : वंदनीय बाळासाहेबांनी दिलेल्या विचारांवर चालणे कधीच थांबवले नाही
Nagpur : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवण्याची धमकी देणार इमेल प्राप्त झाला होता. या प्रकरणी बुलढाण्यातून दोघांना ताब्यात घेण्यात आले. आज (२१ फेब्रुवारी) मेळावा आणि आभार सभेसाठी एकनाथ शिंदे नागपुरात आले आहेत. यावेळी यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, ठार मारण्याच्या धमक्या यापूर्वीही आल्या आहेत, पण मी कधी घाबरलो नाही, असे ते म्हणाले.
डान्सबार बंद केले, तेव्हाही खूप धमक्या आल्या होत्या. ठार मारण्याच्या धमक्या आल्या, तसे प्रयत्नही झाले. मात्र मी घाबरलो नाही. नक्षलवाद्यांनी ही धमकी दिली होती. मात्र त्यांच्याही धमक्यांना भीक घातली नाही. गडचिरोलीत पहिला औद्योगिक प्रकल्प सुरू करण्याचे काम मी केले. त्याचा विरोध करण्याचे प्रयत्न झाले. पण वंदनीय बाळासाहेबांनी दिलेल्या विचारांवर चालणे कधीच थांबवले नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Forest Department : आता बिबट्याचे कातडे सापडले; तस्करी करणाऱ्यांचे पाय खोलात
जिंकल्यावर जबाबदारी वाढली..
एकनाथ शिंदे यांचे आज विदर्भातील गोंदिया, नागपूर आणि कन्हान येथे मेळावा आणि सभा आहे. यासंदर्भात विचारले असता, दोन मेळावे आयोजित केले आहेत. निवडणूक प्रचारात मी सांगितले होते की निवडणूक जिंकल्यानंतर मी येईल. त्या अनुषंगाने आजचा दौरा आहे. जिंकल्यानंतर आमची जबाबदारी वाढली आहे. त्याच अनुषंगाने लोकांचे आभार मानायला विदर्भात आलो आहे, असे ते म्हणाले.
कोस्टल रोडच्या विषयात मी स्वतः लक्ष घालीन. मुंबई महापालिका आयुक्तांशी मी बोललो आहे. त्यांना हे विषय गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दहावीच्या पेपरफुटीसंदर्भात चौकशी केली जाईल. कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा आमच्या सरकारचा संकल्प आहे. ओव्हरा कमिटी रिपोर्टच्या संदर्भात माहिती घेतो आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Devendra Fadnavis : गृहमंत्र्यांचे शहर हादरले, दोन महिन्यांत १३, बारा तासांत दोन हत्याकांड !
धक्कातंत्र..
एकनाथ शिंदे यांनी पूर्व विदर्भात मेळावे आणि सभा घेऊन धक्कातंत्र सुरू केले आहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, विधानसभा निवडणुकीत लोकांनी धक्का देऊन त्यांना बाहेर बसवले आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना धक्का दिला आहे. बाळासाहेबांचा विचार सोडला आहे. पक्षातील चांगल्या लोकांना धक्का मारून पक्षाबाहेर काढणारे जे नेते आहे, जनता त्यांना धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच शिवसैनिक आमच्यासोबत येत आहेत. विश्वास दाखवत आहेत. शेअर बाजारात ज्या शेअरची पत असते, ते शेअर लोक खरेदी करतात. आणि अशीच आमची शिवसेना आहे, असे ते म्हणाले.
पालकमंत्री संदर्भातला तिढा लवकर सुटेल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. एसटीमध्ये महिलांना 50% ची सवलत बंद केली जाणार नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. याशिवाय नरेंद्र महाराजांचं मोठं अधिष्ठान आहे. त्यांच्या लोकांनीदेखील आमच्या महायुतीच्या पाठीशी राहून सहकार्य केलं असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.