25 Minutes ‘One-to-One’ Discussion : विमानतळावरून निघताच थेट सिपना महाविद्यालय गाठले; जगदीश गुप्तांकडून परतीचे संकेत
Amravati अमरावती महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम विदर्भाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. तिकीट वाटपावरून नाराज होऊन शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाचा राजीनामा देणारे ज्येष्ठ नेते जगदीश गुप्ता यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अचानक भेट घेतली. विमानतळावरून सभेसाठी निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी अचानक आपला मार्ग बदलून गुप्तांशी २५ मिनिटे बंद दाराआड चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
३० डिसेंबर रोजी जगदीश गुप्ता यांनी शिवसेनेच्या पश्चिम विदर्भ संघटन प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र, बुधवारी अकोल्यातील सभेत गुप्ता केवळ व्यासपीठावरच दिसले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांच्या आग्रहाखातर त्यांनी भाषणही केले. “आपण सर्व भगवाप्रेमी असून आगामी निवडणुकीत भगव्यालाच विजयी करू,” असे आवाहन करत त्यांनी शिवसेनेच्या प्रचाराला बळ दिले.
Bmc election : मुंबईत जन्माशिवाय प्रश्न कळत नाहीत म्हणणं म्हणजे नैराश्य
जगदीश गुप्ता हे अमरावती जिल्ह्याच्या राजकारणातील एक ‘तगडा’ चेहरा मानले जातात. दोन वेळा आमदार, एकदा विधान परिषद सदस्य आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री. भाजपनंतर शिवसेनेची वाट धरणाऱ्या गुप्ता यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध केले होते.
Digital Census : १८७२ नंतर पहिल्यांदाच ‘पेपरलेस’ जनगणना; २०२७ साठी मेहकर तालुक्यात जय्यत तयारी
या अनपेक्षित भेटीनंतर ‘दिव्य मराठी’शी बोलताना जगदीश गुप्ता यांनी स्पष्ट केले की, सध्या ते मुख्यमंत्र्यांना निरोप देण्यासाठी जात आहेत. मात्र, “हे परतीचे संकेत मानायचे का?” या प्रश्नावर त्यांनी दिलेला होकारार्थी प्रतिसाद अमरावतीच्या पालिका राजकारणाची सर्व समीकरणे बदलणारा ठरू शकतो. मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नाराजी दूर केल्याने, आता जगदीश गुप्ता पुन्हा एकदा सक्रिय होऊन शिवसेनेच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीला अमरावतीमध्ये मोठे बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








