Election commission of India : अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी

Akola Collector Ajit Kumhar is an excellent election decision officer : आयोगाकडून राष्ट्रीय मतदारदिनी पुण्यात होणार गौरव

Akola राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कारासाठी अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची निवड झाली आहे. राष्ट्रीय मतदार दिनीं (२५ जानेवारी) पुणे येथील राज्यस्तरीय कार्यक्रमात या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

०६-अकोला लोकसभा मतदारसंघातील नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.

SDPO Yavatmal : एसडीपीओसह एलसीबीचे पथक तळ ठोकून !

पुरस्काराच्या घोषणेनंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपविभागीय अधिकारी अनिता भालेराव आदींनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले, “निवडणुकीच्या काळात सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अविश्रांत परिश्रम घेत निवडणुकीची प्रक्रिया सुव्यवस्थित पार पाडली. सर्वांच्या योगदानामुळे हा पुरस्कार जिल्ह्याला मिळाला आहे.” त्यांनी सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Cyber ​​police : ‘फ्री गिफ्ट’चा मेसेज येतो, अन् खाते साफ करून जातो!

निवडणूक काळात मतदार नोंदणी बद्दल झालेल्या आरोपानंतरही परिस्थितीत अतिशय योग्य प्रमाणे हाताळून निर्विघ्नपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडल्याबद्दल जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. भाजप नेते विजय अग्रवाल यांनी मतदार यादीवर आक्षेप घेतले होते. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा न्यायालयातही धाव घेतली आहे.