Election Commission : कोणताही बदल न करता आरक्षणाची यादी केली अंतिम

Reservation List Finalized Without Any Changes : अमरावती जिल्हा परिषदेच्या ५९ व १४ पंचायत समित्यांच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब

Amravati राज्य निवडणूक आयोगाने अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद व १४ पंचायत समित्यांमधील एकूण ११८ मतदारसंघांच्या आरक्षणावर अखेर शिक्कामोर्तब केले आहे. आयोगाचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आशिष येरेकर यांनी सोमवारी ही घोषणा केली. या आरक्षणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

१३ ऑक्टोबर रोजी आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील मतदारसंघांची आरक्षण सोडत काढली होती. त्यानंतर १४ ते १७ ऑक्टोबरदरम्यान सूचना व हरकती मागविण्यात आल्या. प्राप्त हरकतींची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी आवश्यक त्या ठिकाणी सुनावणीही घेतली.

Amit Baghel controversy : भाजपच्या नेत्यांची छत्तीसगड सरकारकडे तक्रार!

सोडतीनुसार जिल्हा परिषदेच्या ५९ मतदारसंघांपैकी ११ अनुसूचित जातीसाठी (एससी), १२ अनुसूचित जमातीसाठी (एसटी) आणि १५ मतदारसंघ नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (नामप्र) राखीव ठरले आहेत. उर्वरित २१ मतदारसंघ सर्वसाधारण नागरिकांसाठी खुले आहेत. एकूण ५९ जागांपैकी ३० जागांवर महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे.

Vote theft case : राज्यातील सर्व मतदार याद्या स्क्रॅप करण्याची गरज

राज्य निवडणूक आयोगाच्या आधीच्या वेळापत्रकानुसार आरक्षणाची अंतिम घोषणा ३१ ऑक्टोबरला होणार होती. मात्र, तीन दिवसांची मुदतवाढ देऊन अखेर ३ नोव्हेंबर रोजी यादी प्रसिद्ध करण्यात आली. आयोगाच्या मान्यतेने अंतिम झालेली जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षणाची यादी जिल्हा परिषद मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभाग, तसेच जिल्ह्यातील सर्व तहसील आणि पंचायत समित्यांमध्ये नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Controversial statement : ‘एक वेळ आई मेली तरी चालेल’… शिंदे गटाच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य !

दरम्यान, विभागीय आयुक्तांनी एकूण १३ हरकतींची सुनावणी घेतली होती. तथापि, कोणताही ठोस पुरावा न सादर झाल्याने आरक्षणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे बदलाची मागणी करणाऱ्यांना आता न्यायालयीन मार्ग अवलंबावा लागणार आहे.